शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
4
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
5
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
6
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
7
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
8
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
9
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
10
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
11
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
12
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
13
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
14
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
15
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
16
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
17
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
18
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
19
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
20
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!

Corona Vaccine Pune : पुणे शहरात रविवारी फक्त १५ केंद्रावर लसीकरण सुरु राहणार; 'कोव्हॅक्सिन' लस उपलब्ध असणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 21:20 IST

पुणे शहरात रविवारी फक्त १५ केंद्रावर लसीकरण सुरु राहणार; 'कोव्हॅक्सिन' लस दिली जाणार 

पुणे : पुणे शहरात रविवारी (दि. १६) ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी एकूण १५ केंद्र उपलब्ध असणार आहे. या सर्व केंद्रांवर कोवॅक्सिन ही लस देण्यात येणार आहे अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. तसेच १७ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस दिला जाणार आहे.

शहरातील सर्वच केंद्रांवर उद्या फक्त लस ही दुसऱ्या डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही असेही मोहोळ यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. उद्या देखील नागरिकांना कोविशिल्ड लस उपलब्ध होणार नाही  हे यावरून निश्चित झाले आहे. 

पुणे शहरात लसीकरणाची मोठी मोहीम राबविली जात आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी, लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे बंद लागलेली लसीकरण केंद्र, बरेच तास रांगेत उभे राहून देखील रिकाम्या हाताने घरी परतावे लागल्यामुळे होणारी चिडचिड असे एक ना अनेक अनुभव लसीकरण मोहिमेत नागरिकांना येत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना देखील केल्या जात आहे. 

शहरातील १९४ पैकी दहा केंद्रांवर सर्वाधिक लसीकरण 

शहरातील एकूण १९४ लसीकरण केंद्रांपैकी दहा केंद्रांवर सर्वाधिक लसीकरण करण्यात आले आहे. आजवर एकूण ९ लाख ३५ हजार ५८२ नागरिकांनी लस घेतली असून यातील १ लाख ८० हजार लसी या दहा केंद्रांवर देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्वाधिक लसीकरण झालेल्या 'टॉप टेन' केंद्रांमध्ये कोथरूड, येरवडा, शिवाजीनगर, धायरी, बिबवेवाडी, पद्मावती या भागातील रुग्णालयातील केंद्रांचा समावेश आहे. यामध्ये कमला नेहरू केंद्र पहिल्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका