शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine Pune : पुण्यात महापालिकेचा कोरोना प्रतिबंधक लसींचा साठाच संपला;रविवारच्या लसीकरणाचे भवितव्य टांगणीला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 00:08 IST

दिवसभरात अवघ्या ५ हजार २७२ जणांनाच लस देण्यात आली.

पुणे : पालिकेकडे शिल्लक असलेल्या लसींचा साठा शनिवारी सकाळीच संपला. त्यामुळे शहरातील निम्म्याच लसीकरण केंद्रांवर लसीकरण झाले. उर्वरित ठिकाणी नागरिकांना हात हलवत परत जावे लागले. दिवसभरात अवघ्या ५ हजार २७२ जणांनाच लस देण्यात आली. साथ संपल्यावर अनेक केंद्रांवर साठा संपल्याचे फलक लावण्यात आले होते. 

मागणीप्रमाणे लसी प्राप्त मिळत नसल्याने पालिका प्रशासनातील अधिकारी हतबल झाले आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत लसींचा नवीन साठा प्राप्त झाला नव्हता. त्यामुळे रविवारच्या लसीकरणावर त्याचा परिणाम होणार आहे. रात्रीतून साठा प्राप्त न झाल्यास शहरातील लसीकरण रविवारी बंद ठेवावे लागणार आहे. 

येत्या १ तारखेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. परंतु,  सध्या लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने मोठा गोंधळ उडण्याची चिन्हे आहेत. शहराला मागील दोन दिवसांपासून लसच उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पालिकेकडील सर्व साठा संपला आहे. त्यामुळे १७२ लसीकरण केंद्रांपैकी जेमतेम निम्म्याच केंद्रांवर जेवढ्या लसी शिल्लक होत्या तेव्हढ्या देण्यात आल्या. मागील सव्वातीन महिन्यांत ७ लाख ५० हजार लसीकरण झाले आहे. यामध्ये लसींचे दोन डोस घेतलेल्यांचाही समावेश आहे.     

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका