शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination Pune : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुणे महापालिकेवर खासगी कंपन्यांचा दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 13:48 IST

महापालिकेच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत एकाच दिवसात परवानगी देण्याचा केला जातोय आग्रह ...

पुणे : खासगी कंपन्यांना खासगी रुग्णालयांसोबत करार करून कामाच्या ठिकाणीच लस देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. या लसीकरणासाठी एकाच दिवसात परवानगी देण्यासाठी कंपन्यांचे प्रतिनिधी पालिकेच्या अतिवरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दबाव आणत आहेत. या लसीकरणासाठी पालिकेला कोविन अँपवर लॉग-इन आणि सेशन तयार करून द्यावे लागणार आहे. आपापल्या भागात लसीकरण केंद्र देण्यासाठी नगरसेवकांनी आधी दबाव टाकला होता. नगरसेवकांच्या मागणीची पूर्तता केली जाते न जाते तोच कंपन्यांकडून ही मागणी सुरू झाली आहे. अनेक कंपन्यांची कागपत्रेही अपूर्ण असल्याने परवानगी कशी द्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी रुग्णालयांना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून खासगी कंपन्यांना संपर्क साधून त्यांच्याशी करार करून 'वर्क प्लेस' लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. 

या लसीकरणासाठी को-विन अँपचे लॉग-इन, कंपनी आणि रुग्णालयातील करार, लाभार्थी संख्या, डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिकेची व्यवस्था हे तपासण्याची जबाबदारी विभागीय आरोग्य अधिकाऱ्यांवर आहे. तात्काळ लसीकरण व्हावे याकरिता खासगी कंपन्यांचे अधिकारी थेट पालिकेच्या वरिष्ठांशी संपर्क साधून मान्यता द्या असे सांगत आहेत. परवानगी देण्याबाबत वरिष्ठांकडून थेट विभागीय वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन केले जात आहेत. त्याच हवाल्याने कंपन्यांचे प्रतिनिधी सुद्धा अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. ---- दबावामुळे गडबड होत असुम त्यामुळे कागदपत्रांची तपासणी करताना अनेक त्रुटी रहात आहेत. एक दोन तासांमध्ये प्रस्ताव मंजूर करणे शक्य नाही. त्याकरिता 'एसओपी' तयार करण्याची मागणी अधिकारी करीत आहेत. ---- खासगी रुग्णालयांनीच कंपन्यांची पाहणी करणे आवश्यक आहे. ही त्यांची देखील जबाबदारी आहे. आरोग्य विभागाकडे प्रस्ताव प्रलंबित राहात आहेत. कागदपत्र तपासणीसाठी मिळकतकर विभागाचे १५ अतिरिक्त कर्मचारी दिले आहेत. - रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लस