शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरूनगर एसटी आगारात कोरोनाचा शिरकाव ; प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 19:23 IST

कोरोनाबाधित सापडल्यामुळे राजगुरूनगर एसटी आगाराच्या एसटीच्या चक्राची गती काहीशी मंदावली आहे.

ठळक मुद्देनागरिकाकांडून स्वच्छता व काळजी घेण्याकडे दुर्लक्ष

राजगुरुनगर ; राजगुरूनगर एसटी आगारात कोरोनाचा शिरकाव झाला असून एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून काही कर्मचारी स्वतःहून विलगीकरणात राहिले आहेत.      राजगुरूनगर एसटी आगारातील कार्यशाळेतील कार्यालयात व आगारव्यवस्थापक यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले एक कर्मचारी हे कोरोनाबाधित झाले असून, त्यामुळे नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या राजगुरुनगर एसटी आगाराच्या एसटीच्या चक्राची गती काहीशी मंदावली आहे. तर संबंधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. मधुमेहाच्या व्याधीने त्रस्त असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी याचा धसका घेऊन कामावर येणेच थांबविले आहे. तसेच ही बातमी बाहेर पसरल्यामुळे एसटीची आधीच कमी असलेली प्रवासी संख्या अधिकच रोडावली आहे. 

           राजगुरुनगर एसटी बसस्थानकावरही सोशल डिस्टंसिंगचे कोणतेही पालन होताना दिसत नाही. बसस्थानक परिसरात हॉटेल हॉटेलचे अनेक स्टॉल चालू केल्यामुळे प्रवाशांच्या गर्दीत या स्टॉलमुळे भर पडत आहे. व तेथे कोणतेही सोशल डिस्टंसिंग पाळताना दिसत नाही. हॉटेलचे बेसिन-नळकोंडाळे बसस्थानकात बांधल्याने अनेक प्रवासी तेथेच थुंकणे, तंबाखू-पान खाऊन पिचकाऱ्या मारणे, ओकाऱ्या काढणे असे प्रकार करत असल्याने कोरोनाचा फैलाव होण्यास आयतेच साधन प्राप्त झाल्याचे काही प्रवाशांनी बोलताना सांगितले. तसेच याच नळावर हॉटेलचे कामगार भांडी विसळत असतात. त्यामुळे प्रवाशांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बसस्थानकाला अवकळा आल्याचे दिसून येते.

       बसस्थानकावर झोपलेले तळीराम, हॉटेलचा कचरा भरून वाहत असलेले बसस्थानकाच्या फलाटावरचे कचऱ्याचे डबे असे दृश्य येथे नित्य दिसत आहे. आगारात कोरोनाग्रस्त कर्मचारी सापडल्याने कोरोनाच्या भीतीने एसटीचे कर्मचारी भेदरलेल्या अवस्थेत काम करताना दिसतात. संबंधित कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याचे कुटुंबियही विलगीकरणात राहिले आहे.

टॅग्स :KhedखेडST Strikeएसटी संपcorona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारी