या प्रकरणाचा तपास करीत असताना महाळुंगे स्थानिक गुन्हे शाखेने तांब्याची तारेची चोरी करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोेकून टोळीचा पर्दाफाश केला आहे.
या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली, असून पुढील प्रमाणे नावे आहेत. योगेश तात्या बोराडे (२०) रा. वाकी खुर्द सुंदरनगर तालुका खेड जिल्हा पुणे, २) प्रसाद मंगलदास सोमवंशी (१९), ३)ओमकार मच्छिंद्र कारले (वय ३७), ४) संदीप गोपनाथ पुणेकर (वय २०) ( रा. कुरुळी तालुका खेड, जिल्हा पुणे.)
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालत असताना आलेल्या संशयावरून आरोपींना पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. गुन्ह्याचा तपास होताच पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर भादवि कलम ४५७,४५७,३८० प्रमाणे फिर्यादी शशीमोहन नरेंद्रदेव शर्मा (वय ३६) रा. भोसरी, ता. हवेली यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग रामचंद्र जाधव महाळुंगे पोलीस चौकी चे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, आर. जी. मोरे, पोलीस हवालदार गवारी, हवालदार कोणकेरी, बोराटे, वाजे, वाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे, सांगळे काळे तसेच महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांनी केली आहे.
कंपनीतून तांब्याची चोरी करणाऱ्या आरोपींना महाळुंगे पोलिसांनी अटक केली.