शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त पोलीस निरीक्षक पुराणीकांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:12 IST

पुणे : इंटिरीयर डेकोरेटरना मारहाण करून कानाला पिस्तूल लावणे, वाहनचालकाला शिवीगाळ करणे अशा आरोंपामुळे वादग्रस्त ठरलेल्या पोलीस निरीक्षकाची अखेर ...

पुणे : इंटिरीयर डेकोरेटरना मारहाण करून कानाला पिस्तूल लावणे,

वाहनचालकाला शिवीगाळ करणे अशा आरोंपामुळे वादग्रस्त ठरलेल्या

पोलीस निरीक्षकाची अखेर बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांची वाहतूक शाखेतून विशेष शाखेत बदली

करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी याबाबतचा

आदेश काढला आहे.

घराचे इंटिरीयर डेकोरेशनचे काम व्यवस्थित झाले नाही म्हणून राजेश पुराणिक

यांनी इंटिरीयर डेकोरेटरला कार्यालयात बोलावून तेथे त्याला मारहाण केली व

त्याच्या कानाला पिस्तूल लावले होते. तसेच दिलेले पैसे परत मागितले होते.

याप्रकरणी राजेश पुराणिक यांच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र

गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाची चौकशी करण्यात येत असून

तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढे कारवाई होईल, असे सांगितले

होते. मात्र, त्यानंतर अद्याप कोणती कारवाई करण्यात आल्याचे आढळून आलेले नाही.

या प्रकरणानंतर आणखी एक तक्रारदार विश्वास जाधव (वय ४८, रा. भवानी पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून राजेश पुराणिक यांच्यावर ३२३, ५०४, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचा मुलगा तन्मय हा नाना पेठेत सामान आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याची ॲक्टिव्हा दुचाकी वाहतूक पोलिसांनी उचलून नेली. तक्रारदार हे समर्थ वाहतूक विभागात गाडी सोडवण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक राजेश

पुराणिक यांना विनाकारण गाडी उचलून आणल्याबाबत विचारणा करून मदत करण्याची विनंती केली. त्यावेळी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने तन्मयने शिवी दिल्याची खोटी माहिती पुराणिक यांना दिली. याचा राग आल्याने पुराणिक यांनी मुलगा तन्मय आणि तक्रारदार यांना शिवीगाळ करून दमदाटी करत मारहाण केली. तसेच मुलाच्या मोबाईलच्या स्क्रिनचे नुकसान करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. एका पाठोपाठ दोन गुन्हे दाखल झाल्याने शेवटी शहर पोलीस प्रशासनाने राजेश पुराणिक यांची वाहतूक शाखेतून विशेष शाखेत बदली केली आहे.