शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील 'आंबील ओढा कलव्हर्ट' च्या ३८ कोटी रुपयांच्या निविदेत ठेकेदारांची 'रिंग'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 20:58 IST

पुणे महापालिका कारणे दाखवा नोटीस बजावणार 

ठळक मुद्देशहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात झाले होते आंबील ओढ्यावरील पुलांचे नुकसानअपात्र ठेकेदारांना पात्र ठरविण्यात आल्याचा प्रताप उघडकीस

अपात्र असतानाही दिली मंजुरी पुणे : शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आंबील ओढ्यावरील पुलांचे नुकसान झाले होते. या २१ ठिकाणच्या कलव्हर्टच्या बांधकामाकरिता काढण्यात आलेल्या ३८ कोटी रुपयांच्या निविदेमध्ये ठेकेदारांची 'रिंग' झाली असून अपात्र ठेकेदारांना पात्र ठरविण्यात आल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. याप्रकरणी सल्लागाराला पालिका कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे.

 शहरात २५ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आला होता. यामध्ये सर्वाधिक नुकसान आंबील ओढ्याचे झोके होते. १४ किलोमीटरच्या या नाल्यावर नुकसान झालेल्या कलव्हर्टसचे काम करण्याकरिता पालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. एकूण ३८ कोटींच्या पाच निविदा काढण्यात आल्या होत्या. या कामाकरिता पालिकेने सल्लागार म्हणून एका कंपनीची नेमणूक केली होती. ठेकेदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून त्याची माहिती प्रशासनाला देणे सल्लागाराचे काम होते. परंतु, अपात्र असलेल्या ठेकेदारांना पात्र ठरविण्यात आल्याचा आणि यामध्ये ठेकेदारांनी 'रिंग' केल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केला होता. याबाबत आयुक्तांना पत्रही देण्यात आली होती.

 दरम्यान, यातील दोन निविदा रद्द ठेकेदार अपात्र ठरविण्यात आल्याने रद्द करण्यात आल्या. तर, अन्य तीन निविदा स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आल्या होत्या. स्थायीने त्याला मान्यता दिली होती. अद्याप त्यांना वर्क आॅर्डर देण्यात आलेली नव्हती. पात्र नसताना निविदा उघडल्याने झालेल्या गदारोळामुळे संशयाची सुई सल्लागारकडे गेल्याचा विरोधी पक्षांचा आरोप आहे. संशयाच्या भोव?्यात अडकलेल्या या निविदांप्रकरणी सल्लागाराला खुलासा करण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेfloodपूरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका