शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

कंत्राटी सफाई कामगार सहा महिने वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 02:06 IST

प्रशासनाच्या धोरणामुळे परिणाम; राहती घरेही सोडली

पुणे : मुदत संपल्यानंतरही काम करून घेण्याच्या प्रशासनाच्या धोरणामुळे सफाई कर्मचाऱ्यांना सलग ६ महिने वेतनाविना काम करावे लागत आहे. महापालिकेत ठेकेदारांच्या मार्फत कंत्राटी पद्धतीवर काम करणाºया कर्मचाºयांचे प्रशासनाच्या या धोरणामुळे हाल सुरू असून, भाडे न जमा केल्यामुळे काहींना राहती घरेही सोडावी लागली आहेत.महापालिका हद्दीचे क्षेत्रफळ वाढल्यामुळे आता कायम स्वरूपाच्या कर्मचाºयांची संख्या अपुरी पडते. त्यामुळेच कंत्राटी पद्धतीने कामगार घेऊन प्रशासनाकडून रस्त्यांची स्वच्छता केली जाते. त्यासाठी ठेकेदारांकडून कामगार घेतले जातात. किमान पाच ते सहा हजार कामगार महापालिकेत या पद्धतीने काम करत आहे. त्यातील सर्वाधिक कामगार हे झाडण कामगार म्हणून काम करतात. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात असे कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार काम करत आहेत. त्यातही महिला कामगारांची संख्या जास्त आहे. ठेकेदार निविदा दाखल करतात त्याला मुदत असते. मुदत संपली की त्यांनी त्यांचे कामगार काढून घ्यायचे असतात. प्रत्यक्षात असे होत नाही. निविदेची मुदत संपल्यामुळे ठेकेदाराला त्याचे बिल मिळत नाही, त्यामुळे तो कामगारांना वेतन देत नाही अशा अडचणीत ही व्यवस्था सापडली आहे. कामच मिळत नसल्यामुळे आज ना उद्या वेतन मिळेल व कामही सुरू राहील, या आशेवर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ हे कामगार काम करत राहतात. प्रामुख्याने हडपसर व नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हा प्रकार सुरू आहे. त्याशिवाय अन्य क्षेत्रीय कार्यालयांमध्येही दुसरी कामे करणाºया कंत्राटी कामगारांचीही हीच स्थिती आहे.रस्ते स्वच्छ करण्याचे काम आवश्यक काम असते. कायम कामगार मिळाले नाहीत, तर क्षेत्रीय कार्यालयाकडे रस्ते अस्वच्छ आहेत, कचरा साचला आहे अशा तक्रारी नागरिकांकडून येतात. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाकडून आहे तेच कामगार त्यांच्या निविदेची मुदत संपली तरीही कायम ठेवले जातात. काम मिळते आहे म्हणून ठेकेदारही अधिकाºयांवर विसंबून कामगारांना काम करायला लावतो; मात्र त्या कामाची निविदाच नसल्यामुळे त्याचे बिल काढण्यात प्रशासकीय अडचणी येतात. ठेकेदार काही दिवस खिशातील पैसे देतात. पण, नंतर त्यांनाही शक्य होत नसल्याने कामगारांचे वेतन थकते. हडपसर क्षेत्रीय कार्यालयात ३५० पेक्षा जास्त कामगारांचे असे पाच महिन्यांचे वेतन थकलेले आहे. नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयासह अन्य कार्यालयांमध्येही जवळपास अशीच अवस्था आहे.रस्ते स्वच्छ करायचे काम आवश्यक काम असल्यामुळे असे होत असते ही वस्तुस्थिती आहे; मात्र आता त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्यात येत आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला वार्षिक १ कोटी रुपयांची निविदा या कामासाठी काढायचे अधिकार देण्यात येत आहेत. त्यातून त्यांनी ११ महिन्यांच्या करारावर कामगार घ्यावेत, असे सांगण्यात आले आहेत. त्यानंतर पुढच्या वर्षी नव्याने ११ महिन्यांची निविदा काढण्यात येईल. यामुळे सध्या होत आहे ती अडचण दूर होईल.- शिवाजी दौंडकर,मुख्य कामगार अधिकारी, महापालिका

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे