शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पडून असलेले गणवेश खपविण्यासाठी खटाटोप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 06:55 IST

दोन वर्षांपूर्वीचे पडून असलेले गणवेश डीबीटीमार्फत खपविण्यासाठी काही पदाधिकाºयांना हाताशी धरून ठेकेदारांकडून हा उद्योग सुरू आहे.

पुणे : वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये होणार भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. केंद्राच्या धोरणानुसार पुणे महापालिकेतदेखील प्रशासनाने विद्यार्थ्यांना गणवेश खेरदीसाठी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. परंतु, याला महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांनी विरोध केला असून, पुन्हा डीबीटी योजना राबविण्याचा घाट घातला आहे. यामध्ये दोन वर्षांपूर्वीचे पडून असलेले गणवेश डीबीटीमार्फत खपविण्यासाठी काही पदाधिकाºयांना हाताशी धरून ठेकेदारांकडून हा उद्योग सुरू आहे. यासाठी यंदा पुन्हा गणवेशाचा रंग बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.शासनाच्या धोरणानुसार महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीसाठीचा निधी थेट संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला. परंतु, स्थायी समिती अध्यक्षांनी हा प्रस्तावच दाखल करून घेतला नाही. बैठकीमध्ये गतवर्षी प्रमाणेच पुन्हा डीबीटी योजनेमार्फत विद्यार्थ्यांना साहित्य पुरविण्यावर चर्चा करण्यात आली. याबाबत आता पुन्हा मंगळवारी होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.महापालिकेच्या वतीने गतवर्षी डीबीटी योजना राबविताना अनेक अडचणी आल्या होत्या. यामध्ये ठेकेदाराकडून विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे होते. असे असताना यंदा पुन्हा डीबीटीचा घाट घातला जात आहे. याबाबत अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणवेश पुरविणाºया एका ठेकेदाराकडे जुन्या रंगाचे तब्बल लाखभर गणेवश पडून आहे. दोन वर्षांपासून पडून असलेले हे गणवेश खपविण्यासाठी सध्या हा ठेकेदार प्रयत्नशील आहे. यामुळे येणाºया स्थायी समितीच्या बैठकीत यंदा पुन्हा गणवेशाचा रंग बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतात. यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे ठेकेदारासोबत असलेले लागेबंध पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

टॅग्स :Schoolशाळा