पुणे : चांदणी चौकातून कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या वडगाव येथील वीर बाजी पासलकर पुलावरील कठड्याला कंटनेरची धडक बसून त्याचे केबिन नदीमध्ये पडले. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. त्या केबिनमधील चालकांना बाहेर काढून नागरिकांनी रुग्णालयामध्ये दाखल केले.वडगाव पुलावर कंटेनरवरील चालकाचा तोल सुटून त्याची कठड्याला धडक बसली. त्यामध्ये अपघातग्रस्त कंटेनरचे केबिन अर्धवट अवस्थेत पुलावरून लोंबकळले. त्या वेळी नागरिकांनी केबिनमधील वाहनचालकाला त्यातून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी क्रेन बोलावून लोंबकळत असलेले केबिन काढण्याचा प्रयत्न करीत असताना ते पाण्यात कोसळले. केबिनचे वजन खूप जास्त असल्याने पोलिसांनी बोलावलेल्या क्रेनला ते बाहेर काढता आले नाही. अग्निशामक दलाच्या सिंहगड रोड केंद्राचे प्रमुख प्रभाकर मारटकर, ताडेल पांडुरंग चांदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यामध्ये केबिन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)अन् मोटार कोसळल्याच्या फोनने धावपळ४अपघातग्रस्त कंटेनरचे केबिन बाहेर काढण्यात यश न आल्याने मोठी क्रेन बोलावण्यासाठी पोलीस तेथून निघून गेले. पुलावरून कंटेनरचे पांढऱ्या रंगाचे केबिन पाण्यावर तरंगताना दिसत होते, थोड्या वेळाने तेथून जात असलेल्या नागरिकांना पाण्यात मोटार कोसळल्याचा संशय आला. त्यांनी अग्निशमन दलास फोन करून याची माहिती दिली. नुकतेच नदीत मोटार बुडून चिंचवडमधील एकाच कुटुंबातील ५ जण दगावल्याच्या पार्श्वभूमीवर या बातमीमुळेही चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र केवळ कंटेनरचे केबिन कोसळले असून त्यात कोणीही दगावले नसल्याची त्यांना माहिती मिळताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
कंटेनरचे केबिन कोसळले नदीत
By admin | Updated: March 25, 2015 00:29 IST