शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

टीव्ही कंपनीला ग्राहक मंचाचा दणका

By admin | Updated: November 12, 2014 00:09 IST

वॉरन्टीच्या काळात एलईडी टीव्हीमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे सोनी इंडिया कंपनीने विनामोबदला तो टीव्ही संच दुरुस्त करून द्यावा.

पुणो : वॉरन्टीच्या काळात एलईडी टीव्हीमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे सोनी इंडिया कंपनीने विनामोबदला तो टीव्ही संच दुरुस्त करून द्यावा. त्याचबरोबरच दुरुस्ती केलेल्या तारखेपासून पुढील एक वर्षाची विस्तारित वॉरंटी तक्रारदाराला द्यावी, असा निर्णय ग्राहक मंचाने दिला आहे. तक्रारदाराला नुकसानभरपाई आणि खटल्याचा खर्च म्हणून 5 हजार रुपये देण्याचे आदेशही ग्राहक मंचाने दिले आहेत.
नवी सांगवी येथील नरेंद्र नागेश वानखेडे यांनी पुणो जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत सोनी इंडिया प्रा. लि. आणि कंपनीचे पुण्यातील अधिकृत विक्रेते विजय सेल्स यांना तक्रारदारांनी घेतलेला एलईडी दरुस्त करून द्यावा आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, असे आदेश मंचाचे अध्यक्ष व्ही.पी. उत्पात यांनी दिले आहेत. 
वानखेडे यांनी विजय सेल्स यांच्याकडून सोनी कंपनीचा 64 हजार 9क्क् रुपये किमतीचा एलईडी खरेदी केला होता. मात्र, दुस:याच दिवशी टीव्हीच्या स्क्रीनवर उभी काळी रेघ आल्यामुळे त्यांनी कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रार केली. पाठपुरावा केल्यानंतर वानखेडे यांना दुसरा टीव्ही संच मिळाला. मात्र, सात महिन्यांनी दुस:या टीव्ही संचामध्येही तीच समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांनी पुन्हा कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रार केली. त्या वेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी टीव्हीचा पॅनेल बदलून देण्याबाबत विचारले. त्या वेळी तक्रारदार यांनी वॉरन्टी संपल्यानंतर पुन्हा हीच समस्या निर्माण होऊ शकते, अशी शंका  विचारली. त्या प्रतिनिधींनी वॉरंटी वाढवून घेण्याचा सल्ला दिला. मात्र, ही बाब तक्रारदार यांना मान्य नव्हती. म्हणून त्यांनी टीव्ही संच बदलून देण्याची मागणी केली. वारंवार ई-मेल आणि पत्रव्यवहार करूनही कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेरीस त्यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. 
(प्रतिनिधी)
 
सेवेत त्रुटी असल्याचे निष्पन्न
तक्रारीबाबत कंपनीकडून मंचापुढे उपस्थित राहून त्यांची बाजू मांडली. कंपनीने एलईडी टीव्ही बदलून देणो शक्य नसल्याचे मंचापुढे सांगितले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंचाला कंपनीने तक्रारदाराला सेवेत त्रुटी दिल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कंपनीने दोष निर्माण झालेल्या एलईडी टीव्हीचा पॅनल बदलून द्यावा, पॅनल बदलून दिल्यापासून पुढील एक वर्षार्पयत विस्तारित वॉरंटी विनाखर्च द्यावी, वारंवार टीव्ही बदलावा लागल्यामुळे तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रस सहन करावा लागल्यामुळे ते नुकसानभरपाईस पात्र असल्याचे मंचाने आदेशात म्हटले आहे.