धनकवडी : महावितरण ग्राहकाची स्थानिक पातळीवरील तक्रार निवारणाची सोय बंद केल्यापासून ग्राहकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. तक्रार निवारण करण्यास जास्त वेळ लागत असून, स्थानिक पातळीवरील कोणतीही माहिती ग्राहकांना मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी मुंबईला फोन करणो ग्राहकांना जमत नसल्याने ते वैतागले आहेत.
महावितरणच्या महाराष्ट्रातील काही कोटी असलेल्या ग्राहकांना एकटय़ा मुंबईतील टोल फ्री नंबरच बोळवण करून महावितरण मात्र नामानिराळे झाले आहे. ग्राहकांची तक्रार निवारण निवारण्यासाठी केवळ 4क् अॅापरेटर काम करीत आहेत. ग्राहकांवर टोल फ्री नंबरवर फोन करण्यापेक्षा काहीही करा व काम करुन द्या, अशीच वेळ येत आहे. तक्रार निवारणाचा कारभार कंत्रटी कामगारांच्या भरवश्यावर चालत आहे.
ग्राहकांना टोल फ्री नंबर वापरण्याची माहिती नाही किंवा अद्यापर्पयत सवय झालेली नाही. हा टोल फ्री नंबर लागेल याची खात्री नाही. लागला तरी मुंबईच्या अॅापरेटरला स्थानिक पातळीवरील तक्रारीची किंवा परिसराची माहिती नसते. त्यामुळे ग्राहकाला संपूर्णपणो माहिती देणो गरजेचे राहते.
अपूर्ण माहितीद्वारे तक्रार निवारण होत नाही, कोणत्याही प्रकारच्या तक्रार निवारणासाठी ग्राहक नंबर द्यावा लागतो.
त्याशिवाय तक्रार निवारण होत नाही. (प्रतिनिधी)
स्थानिक पातळीवर सुरू करावे केंद्र
4टोल फ्री नंबरवरील अॅापरेटरना स्थानिक कार्यालयीन अधिका:याबद्दल काहीही माहिती मिळत नाही. स्थानिक कार्यालयातील योग्य ठिकाणचे फोन नंबर मिळत नाही, यामुळे ग्राहकांना याचा त्रस होत असतो. अनेक वेळा फोनच लागत नाहीत, त्याची विचारणा करण्यासाठी वरिष्ठांचेदेखील फोन नंबर दिले जात नाहीत किंवा उपलब्ध नसल्याचे सांगून वेळ मारुन नेत असतात. पूर्वीसारखेच स्थानिक पातळीवर ग्राहक तक्रार निवारण सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.