या वेळी तुकाराम बोडके, राजेंद्र बोडके, सुनील बोडके, संजय बोडके, आबासाहेब बोडके, बबनदादा बोडके, विजय सूर्यवंशी या सर्वचे सांत्वन केले. पिंपरी बुद्रूक गावचे बबन बोडके व विजय गोरख सूर्यवंशी याही दोघांच्या कुटुंबांमध्ये दु:खाचा डोंगर कोसळला असल्याने त्यांचेही राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी भेट देऊन सांत्वन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे व तालुका उपाध्यक्ष नवनाथ रूपनवर यांनीदेखील कुटुंबाची भेट देऊन सांत्वन केले. या वेळी सुरेश शिंदे, नाथा रूपनवर, पिंपरी बुद्रूक येथील माजी आदर्श सरपंच श्रीकांत बोडके, हभप बाळासाहेब घाडगे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार, चेअरमन सुदर्शन बोडके, ग्रामसेवक गणेश लंबाते, चांगदेव बोडके, केशव बोडके, अनिल गायकवाड, जगू मोहिते उपस्थित होते.
भरणे यांच्याकडून बोडके कुटुंबीयांचे सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST