मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी काँग्रेसच्या आज (दि. १३) मुलाखती घेण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष नाना राऊत यांनी दिली.वेल्हे येथील शिवगोरक्ष मंगल कायार्लात झालेल्या मुलाखतींना काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष मुरलीकाका निंबाळकर पक्षनिरीक्षक म्हणून उपस्थित होते. तर, जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव जांभुळकर हेदेखील उपस्थित होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण ६ जागांसाठी २० जण इच्छुक असून सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विंझर-कुरण गटासाठी विद्यमान जिल्हा परिषद सदस्या वसुधा नलावडे यांचे पती अमोल उल्हास नलावडे, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक भगवान पासलकर हेदेखील इच्छुक आहेत. तर, विंझर गण हा ओबीसीसाठी राखीव झाला असून त्यासाठी मूळ ओबीसी उमेदवार मिळत नसल्याचे चित्र आहे. या ठिकाणी मराठा समाजातील ५ उमेदवार इच्छुक असून धनगर समाजातील एक उमेदवार इच्छुक आहे. कुरण गणासाठी तालुकाअध्यक्ष विष्णू राऊत यांची पत्नी सीमा विष्णू राऊत, सपना राजू कडू असे दोन उमेदवार इच्छुक आहेत.जिल्हा परिषद वेल्हे-मार्गासनी गटासाठी विद्यमान सभापती सविता वाडघरे यांचे पती आकाश वाडघरे आणि माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिनकर धरपाळे, तर विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सुषमा रेणुसे व त्यांचे चिरंजीव प्रसाद नामदेव रेणुसे आणि माजी जिल्हा परिषद रामनाना कोकाटे यांचे चिरंजीव सच्चितानंद कोकाटे आणि प्रकाश रेणुसे हेदेखील इच्छुक आहेत. या जिल्हा परिषद गटात इच्छुकांची संख्या जास्त आहेत. त्यामुळे चुरस होईल. वेल्हे गणासाठी संगीता प्रकाश जेधे व नीलिमा पारठे, आशा प्रकाश रेणुसे या इच्छुक आहेत, तर मार्गासनी गणासाठी दिनकर सरपाले, अमित कोकाटे हे इच्छुक आहेत. (वार्ताहर)
वेल्हेत काँग्रेसकडून ६ जागांसाठी २० इच्छुक
By admin | Updated: January 14, 2017 03:23 IST