पुणे: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काँगे्रसच्या वतीने शंभर टक्के जागांवर उमेदवार देण्यात येणार असून, ही निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकदीने व स्वबळावरच लढणार असल्याचे काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी मंगळवारी सांगितले. राष्ट्रवादी काँगे्रसकडून आघाडी करण्यासंदर्भांत कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नसल्याने जगताप व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी मंगळवारी काँगे्रस भवन येथे पक्षाच्या कार्ड समितीची बैठक घेण्यात आली.या बैठकीसाठी संजय जगताप, हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपटे, अशोक मोहोळ, जिल्ह्याचे निरिक्षक आमदार रामहरी रुपनवर, सत्यशिल शेरकर, माजी अध्यक्ष देवीदास भन्साळी,श्रीरंग चव्हाण पाटील, अतुल कारले, सर्व तालुका अध्यक्ष, निवडणूक निरिक्षक बैठकीसाठी उपस्थित होते.या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जगताप यांनी माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या ७५ गाटांसाठी काँगे्रसकडे १२४ इच्छुकांचे अर्ज आले आहेत. तर १३ पंचायत समितीच्या १५० गणांसाठी २६२ अर्ज आले आहेत. त्यामुळे काँगे्रस गट व गणांच्या सर्व जागा सर्व ताकदीनुसार लढविणार आहे.ग्रामीण भागात काँगे्रसला चांगले यश मिळत असल्याचे नगरपालिकांमध्ये स्पष्ट झाले आहे.पक्षासाठी सध्या सकारात्मक वातावरण असून, सेना-भाजप शासनाने गेल्या अडीच वर्षांतील कारभार, नोटा बंदीनंतर शेतकरी, व्यापारी, मंजूर, कामकार व महिला वर्गांची झालेली गैरसोय, अडचणी काँगे्रस प्रभावीपणे माडणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या कारभाराचे वाभाडे प्रामुख्याने प्रचाराचे मुद्दे असणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
काँग्रेस स्वबळावर
By admin | Updated: January 25, 2017 01:38 IST