शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नव्या महापालिकेसाठी काँग्रेसचे उपोषण

By admin | Updated: July 1, 2017 07:53 IST

शहराभोवतालच्या ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा विषय ऐरणीवर असताना काँग्रेसच्या वतीने या गावांचा समावेश महापालिकेत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहराभोवतालच्या ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा विषय ऐरणीवर असताना काँग्रेसच्या वतीने या गावांचा समावेश महापालिकेत न करता त्यांची स्वतंत्र महापालिका करावी, अशी मागणी करत त्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या मागणीचे निवेदन नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले व त्याची प्रत आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आली.आमदार अनंत गाडगीळ, राज्य काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड, सचिव संजय बालगुडे, सदानंद शेट्टी, काका धर्मावत तसेच काँग्रेसचे अन्य पदाधिकारी यात सहभागी झाले होते. याबाबत बोलताना बालगुडे यांनी सांगितले, की पुणे महापालिकेचे आताचे क्षेत्रफळ २५० चौरस किलोमीटर आहे. या गावांचा समावेश केला तर ते साधारण ५०० चौरस किलोमीटर होईल. हा आकार मुंबई महापालिकेपेक्षाही मोठा आहे. या सर्व भागाला नागरी सुविधा पुरवणे अवघड होईल. त्यामुळे त्यांची स्वतंत्र महापालिका करणेच योग्य आहे.गाडगीळ यांनी सांगितले, की हा विषय आर्थिक अडचणी निर्माण करणारा आहे. काही हजार कोटी रुपये या नव्या भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लागतील. सरकार ते देणार नाही व त्या भागातून कराद्वारे इतकी मोठी रक्कम उभी राहणे अवघड आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या तिजोरीतून हा खर्च करावा लागेल. त्याचा परिणाम पुण्यातील विकासकामांवर होईल. म्हणूनच या सर्व परिसरासाठी स्वतंत्र महापालिका करणेच योग्य आहे. सरकारने याचा विचार करणे गरजेचे आहे.