शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडले

By admin | Updated: February 7, 2017 21:45 IST

महापालिका निवडणुकीत घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील गोंधळ चौथ्या दिवशीही सुरू झाला.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 7 - महापालिका निवडणुकीत घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील गोंधळ चौथ्या दिवशीही सुरू झाला. अर्ज माघारीच्या वेळी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक गणेश बीडकर आणि नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच जोरदार वादावादी झाली.मंगळवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले होते. प्रभाग क्रमांक १६ क मधून काँग्रेसतर्फे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यांना एबी फॉर्म मिळाला नव्हता. अस्लम बागवान यांनी काँग्रेसचा एबी फॉर्म भरला आहे. त्यामुळे धंगेकर किंवा बागवान यांच्यापैकी त्यामुळे तेथून अस्लम बागवान किंवा रवींद्र धंगेकर यांच्यापैकी एकाला माघार घेऊन दुसऱ्याला काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले जाणार होते. त्यामुळे दोघेही या कार्यालयात कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. त्याचवेळी एका महिला उमेदवाराच्या माघारीसाठी महापालिकेतील गटनेते आणि याच प्रभागातील भाजपचे उमेदवार गणेश बिडकर हेही तेथे आले.बिडकर यांनी बागवान यांना अर्ज मागे न घेण्यासाठी फूस लावली, असा आरोप धंगेकर यांनी केला. त्यावरून धंगेकर आणि बिडकर यांच्यात निवडणूक निर्णय आधिकाऱ्यांयांसमोरच बाचाबाची झाली. दोघांचेही समर्थक एकमेकांना भिडले. कार्यालयातील खुर्च्या एकमेकांवर भिरकावण्यात आल्या, शिवीगाळही झाली. त्यामुळे या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. यानंतर या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करून परिसर रिकामा करण्यात आला. परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते. भाजपच्या उमेदवाराला अधिकृत उमेदवारी देताना जो न्याय लावला, त्याप्रमाणे मलाही काँग्रेसची अधिकृत उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली. या घटनेबाबत गणेश बिडकर म्हणाले की, प्रभागातील महिला उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यासाठी आलो होतो. त्यावेळी धंगेकर यांनी मला शिवीगाळ करीत अंगावर धावून आले आणि धक्काबुक्की करण्यात आली. माझे कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित होते. बागवान अर्ज मागे घेण्यासाठी आले असता बिडकर यांनी त्यांना अडवले आणि काहींना फोन लावून दिला. ते मला समजले. त्यामुळे मी तत्काळ तेथे आलो. त्यावेळी आपल्या दोघांनाही निवडणूक लढायची आहे. तुम्ही असे का करता, असे मी विचारले. त्यामुळे वाद होऊन धक्काबुक्की झाली, असे धंगेकर यांनी सांगितले. निवडणूक कार्यालयात पोलीस आणि कर्मचारी इतरांना थांबून देत नाहीत. मात्र, बीडकर आणि त्यांच्यासोबतच्या इतर कार्यकर्त्यांना आत कसे सोडले, असा सवालही धंगेकर यांनी केला.