शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महामानवाला अभिवादनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 06:26 IST

भारतरत्न, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त पुणे रेल्वे स्टेशननजीक असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या समोरील बाजूस

येरवडा : भारतरत्न, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त पुणे रेल्वे स्टेशननजीक असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या समोरील बाजूस असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच दिवसभर भीम अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.पुतळ्याच्या समोरील बाजूस सामाजिक कार्यकर्ते शरद गायकवाड यांनी आकर्षक रांगोळीच्या कलाविष्काराच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले. बाबासाहेबांच्या पुतळ्याला दिवसभरात हजारो नागरिकांनी पुष्पहार केल्यामुळे बाबासाहेबांच्या पुतळ्यावर आणि खालील बाजूस पुष्पहारांचा मोठा ढीग साठला होता. तर समोरील बाजूस अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी चळवळीतील विविध राजकीय पक्षांच्या तसेच विविध सामाजिक संघटनांच्या तसेच आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्या पदाधिकाºयांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून अगरबत्त्या आणि मेणबत्त्या प्रज्वलित केल्या गेल्या. त्यामुळे डॉ. आंबेडकर उद्यानात अगरबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. विविध संघटनांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीबद्दल प्रबोधनात्मक पत्रकांचे यावेळी वाटप केले जात होते.सम्यक कलामंचाच्या वतीने भीमगीत गायनाचा कार्यक्रम झाला. दीपक शितोळे, विशाल नितनवरे, सुरेश गायकवाड, रूपेश मोरे यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तर पुणे जिल्हा कलाविकास संघानेसुद्धा भीमगीत गायनाचा कार्यक्रम केला. सुरेश गायकवाड, अशोक केमकर, एस. डी. शिंंदे, बाळासाहेब लालसरे, दिलीप सरोदे यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. कार्यक्रमास प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. वैशाली चांदणे, आरपीआयच्या पुणे महापालिकेतील गटनेत्या सुनीता वाडेकर, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर उद्यानातच याच उपक्रमांतर्गत दिवसभर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संबंधीत सर्व उपक्रमांच्या यशस्वितेसाठी उमेश चव्हाण यांनी संयोजन करून परिश्रम घेतले.‘आमच्या माय-बापानेङ्खफक्त आम्हाला घडविले, पण आमच्या आयुष्याला बाबासाहेबांनी सोन्याने मढविले’, अशा आशयाचे बॅनर्स ठिकठिकाणी रिपब्लिकन प्रेसडियम पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने लावण्यात आले. तर पक्षाचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष राज बोखारे, जिल्हा संघटक अशोक तनपुरे, शहराध्यक्ष संजय ओव्हाळ, संघटक राजन बोखारे, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष हबीब तुटके आदींनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर प्रणित भारिप बहुजन महासंघाच्या वतीने ज्येष्ठ नेते एल. डी. भोसले, वसंतदादा साळवे, रमेश जगताप, विजय बहुले, सतीश बनसोडे, दिलीप गायकवाड, शरद चाबुकस्वार, बाळासाहेब बनसोडे आदींनीही बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ प्रणित दलित पँथरच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे, पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे, सुषमा मंडलिक, सबीना शेख, आरती बाराथे, विठ्ठल केदारी, विशाल खिलारे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शुभम सोनवणे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.केंद्रीय मंत्री रामविलास पासवान प्रणित लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने महाराष्टÑ प्रदेश सरचिटणीस अशोक तथा अण्णासाहेब कांबळे, संजय आल्हाट, रमेश जगताप, कन्हैया पाटोळे, बाळ कांबळे आदींनीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भीमराय मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने मेहबूबभाई शेख, ताहीरभाई शेख, तौशिफ कुरेशी, अमिर सय्यद, नादीर शेख, अन्वर सौदागर, जुनेद शेख, करपाल वाल्मीकी, जरल जोसे, हसन खान आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष रामभाऊ डंबाळे आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सविता सिंंग यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भीमसाम्राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले, प्रदीप पैठणपगार, मंगलम गमरे, दीपक गायकवाड, सलीम शेख, शादील शेख आदींनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भीम-लहुजी महासंग्राम सामाजिक विकास संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष पै. विनोद वैरागर, प्रताप मोहिते, अमोल गेजगे, सोमनाथ पंचरास, संतोष गलांडे, नीलम अय्यर, आश्विनी वैरागर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.बुद्धीस्ट प्रेरणा ग्रुपच्या वतीने संघटनेचे किरण शिंंदे, संदीप जोगदंड, सुमित गायकवाड, अमित माने, विकास ओव्हाळ, संदीप सरोदे, अजय शिंंदे, विजेंद्र गायकवाड, हर्षवर्धन गंभीरे, सुहास शिंंदे, राजेश ढवळे, भारत साळवे, राजेश लोखंडे, प्रभाकर बनसोडे, मनोहर सूर्यवंशी आदींनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या २२ प्रतिज्ञांच्या हजारो पत्रकांचे यावेळी पुतळ्याच्या परिसरात मोफत वाटप केले. पुणे शहर काँगे्रस पक्षाच्या वतीने अध्यक्ष रमेश बागवे, चिटणीस राहुल तायडे, अमर गायकवाड, रोहित खंडागळे, असिफ खान, डॉ. रूपेश कांबळे, मल्लेश कांबळे, एकनाथ काळे, दिलीप ओव्हाळ, संदीप जोडगे आदींनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अरुण भिंंगारदिवे, राजेंद्र अप्पा गायकवाड, अशोक जगताप, प्रवीण पवार, सतीश पंचरास, छाया कांबळे, अप्पा घोरपडे, राणी चौधरी, राजाभाऊ बल्लाळ, रोहित जाधव आदींनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे प्रणित भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अंकुश सोनवणे, प्रदीप कांबळे, बाळासाहेब वाघमारे, विजय गायकवाड, बाळासाहेब भालेराव, बाळासाहेब पोटभरे आदींनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या युवक आघाडीच्या वतीने सोमनाथ पंचरास, तेजश्री पवार, लिलावती दाभाडे, अजय मोरे, भीमा साखरे, राकेश शिरसाट आदींनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भारिप बहुजन महासंघाच्या युवक आघाडीच्या वतीने पुणे शहराध्यक्ष विकास साळवे, गणेश भोसले, प्रेम जाधव, नितीन ताटे, संदीप सोनवणे, रवी चाबुकस्वार, गणेश भोसले आदींनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानाच्या वतीने भीमा कोरेगाव येथील विजयी स्तंभाच्या इतिहासाबद्दल काढलेल्या हजारो पत्रकांचे वाटप समितीच्या मानव कांबळे, अंजुम ईनामदार, रमेश गायचोर, किशोर कांबळे, ज्योती जगताप, विकास कांबळे, किरण शिंंदे, आकाश साबळे, सागर गोरखे, संतोष शिंंदे, दत्ता पोळ, नितीन घोडके, नितीन गायकवाड यांनी केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर