शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

महापुरुषांच्या छायाचित्रांवरून गोंधळ

By admin | Updated: December 19, 2014 23:51 IST

महापालिकेच्या वतीने नववर्षाच्या कॅलेंडरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांची छायाचित्रे न छापता ते प्रसिद्ध करण्यात

पुणे : महापालिकेच्या वतीने नववर्षाच्या कॅलेंडरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांची छायाचित्रे न छापता ते प्रसिद्ध करण्यात आल्याच्या प्रकरणावरून सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ झाला. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी प्रशासनाने छापलेले कॅलेंडर वितरीत करू नये, याचे आदेश दिले. आयुक्त कुणाल कुमार यांनी या प्रकरणी कॅलेंडर तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नववर्षाच्या कॅलेंडरचे सर्वसाधारण सभेमध्ये महापौर व पक्षनेत्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. शहराचा वारसा सांगणाऱ्या वास्तू व व्यक्तींवर हे कॅलेंडर तयार करण्यात आले होते. नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी कॅलेंडरमध्ये महापुरुषांची छायाचित्रेच नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. महापालिकेच्या वतीने ५ हजार ६०० कॅलेंडर छापण्यात आले आहेत. एका कॅलेंडरची किंमत ४७ रुपये धरली, तर २ लाख ६३ हजार रुपयांचा खर्च या कॅलेंडरवर झाला आहे, याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न राजेंद्र वागस्कर यांनी उपस्थित केला. सभागृहनेते अरविंद शिंदे, कमल व्यवहारे यांनी त्यानंतर कॅलेंडर तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, याची जोरदार मागणी लावून धरली. किशोर शिंदे, आबा बागूल, सिद्धार्थ धेंडे यांनीही त्या मागणीला पाठिंबा दर्शविला. निवडणुकीमध्ये छत्रपतींच्या नावाने मते मागता, मग आता शांत का? अशी विचारणा कमल व्यवहारे यांनी भाजपा सदस्यांना केली. (प्रतिनिधी)