शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापोर्टलवरील ऑनलाइन परीक्षेवेळी वीज खंडित झाल्याने गोंधळ; महापोर्टल बंद करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 23:45 IST

कॉलेज परिसरात काही काळ गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वाकड (पुणे): महापोर्टल या वेबसाइटद्वारे मारुंजी येथील अलार्ड कॉलेजमध्ये घेण्यात येणाऱ्या आॅनलाइन परीक्षेसाठी वेळेत लॉगइन झाले नाही. पेपर सुरू असताना अनेकदा वीज खंडित झाल्याने वेळेचा अपव्य झाल्याने नुकसानीचा आरोप करीत दोनशे विद्यार्थ्यांनी सोमवारी परीक्षेवर बहिष्कार घातला. अलार्ड कॉलेज मॅनेजमेंटच्या विरोधात घोषणाबाजी करीत महापोर्टल बंद करण्याची मागणी केली. यामुळे कॉलेज परिसरात काही काळ गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राज्य शासनाच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीसाठी महापोर्टल या वेबसाइटद्वारे आॅनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. मारुंजी येथील अलार्ड कॉलेजमध्ये या परीक्षेचे सेंटर होते. येथे दोन शिफ्टमध्ये सोमवारी आॅनलाइन परीक्षा घेण्यात येणार होती. सकाळी १० वाजता पहिल्या बॅचमधील दोनशे विद्यार्थ्यांचा पेपर होता. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने लॉगइन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा खूप वेळ वाया गेला. दरम्यान, पेपर सुरू असताना अनेक वेळा वीज खंडित झाली़अनेक ठिकाणी संगणक सुरू होत नव्हते. तर काही जणांना संगणकच शिल्लक नव्हते. यामुळे वेळ वाया गेल्याचा आरोप करीत अखेर विद्यार्थी परीक्षेवर बहिष्कार घालून वर्गाबाहेर पडले.पोलिसांनी काढली समजूतया परीक्षा प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत़ त्यातच मुख्य परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना काही गांभीर्य नाही. कॉलेज प्रशासनाचा ढिसाळ कारभार देखील, या समस्येला कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.कॉलेज प्रशासनाच्या विरोधात व महापोर्टलच्या विरोधात घोषणाबाजी केली. अखेर घटनास्थळी दाखल झालेले हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारे यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली.परीक्षेलापुढील तारीख देण्यासाठी महापोर्टल प्रशासनाशी बोलणी केल्याने विद्यार्थ्यांचा रोष व गोंधळ कमी झाला.

टॅग्स :examपरीक्षा