शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्ती अध्यक्षासाठी गोंधळ; निवड महिनाभर प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 02:12 IST

मपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षनिवडीवरून गदारोळ झाला. अखेर तंटामुक्ती अध्यक्षांची निवड प्रलंबित ठेवून पुढील महिन्यात घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

शेलपिंपळगाव : येथील ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षनिवडीवरून गदारोळ झाला. अखेर तंटामुक्ती अध्यक्षांची निवड प्रलंबित ठेवून पुढील महिन्यात घेण्याचे ठरविण्यात आले आहे. सरपंच विद्या मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात विविध विकास विषयांसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी उपसरपंच अनिल पोतले, ग्रामपंचायत सदस्य गणेश दौंडकर, नितीन मोहिते, सागर पोतले, संदीप मोहिते, योगेश दौंडकर, सुनीता मोहिते, सुमन मोहिते, सुनंदा औटी, संगीता गायकवाड, मंगल पोतले, लीलाबाई दौंडकर, आशा मोहिते आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेच्या प्रारंभी ग्रामसेवक उत्तम कांबळे यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विषयांचे ग्रामस्थांसमोर वाचन केले.ग्रामसभेला उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी करून अजेंड्यावरील विषय मान्य केले. विशेषत:, पेयजल योजना कार्यान्वित करणे, १४व्या वित्त आयोग निधीतून विकासकामे करणे, कचरा व्यवस्थापन घंटागाडी पुन्हा सुरू करणे, नागरिकांची जॉबकार्डे बनविणे आदी विषय मंजूर करण्यात आले. तसेच, ग्रामसमिती, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समिती, पाणीपुरवठा समिती स्थापन करण्यात आली. ग्रामसभेच्या शेवटी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षनिवडीचा विषय ग्रामसभेत मांडण्यात आला.पोलिसांमुळे शांततातंटामुक्ती अध्यक्षपदासाठी ६ पुरुष व २ महिलांचे असे एकूण ८ अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु, अध्यक्षनिवडीबाबत एकमत न झाल्याने ग्रामसभेची सांगता करण्यात आली. दरम्यान, ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चाकण पोलिसांनी कडक बंदोबस्तामुळे तणाव निवळला.

टॅग्स :Puneपुणे