शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेएम राेडवर पार्किंगबाबत 'कन्फ्युजन ही कन्फुजन है'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 18:02 IST

जंगली महाराज रस्त्याचे नव्याने करण्यात आलेल्या नुतनीकरणामध्ये पार्किंगसाठी विशिष्ट रचना करण्यात आली अाहे. परंतु या रचनेबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम असून कश्याही प्रकारे वाहन लावली जात असल्याचे चित्र अाहे.

ठळक मुद्देपार्किंगबद्दलच्या संभ्रमामुळे केली जातीये डबल पार्किंगवाहतूक पाेलिसांकडून कारवाई हाेण्याची आवश्यकता

पुणे : पुणे महानगरपालिकेतर्फे जंगली महाराज रस्त्याची नव्याने अाखणी केली. संपूर्ण रस्त्याला एक वेगळे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला गेला. पादचाऱ्यांना सुरक्षितरित्या चालता यावे यासाठी पदपथ वाढवण्यात अाले. त्याचबराेबर बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. लहान मुलांसाठी खेळणी येथे लाव्याण्यात आली. याबराेबरच पार्किंगची विशिष्ट रचनाही याठिकाणी करण्यात अाली. मात्र हिच नव्याने करण्यात अालेली रचना आता वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचे चित्र अाहे.     जंगली महाराज रस्ता जिथे सुरु हाेताे, तिथे दाेन्ही बाजूंना पार्किंगची साेय उपलब्ध करुन देण्यात आली अाहे. पदपथाच्या बाजूला विशिष्ट जागा करुन वाहने लावता येतील अशी रचना येथे करण्यात आली अाहे. जेणेकरुन लावलेली वाहने मुख्य रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना अडथळा ठरणार नाहीत. या ठिकाणी कुठल्या प्रकारची वाहने लावायची अर्थात दुचाकी किंवा चारचाकी याची पाटी लावण्यात आली अाहे. बहुतांश ठिकाणी दुचाकीसाठी जागा देण्यात आली अाहे. दुचाकीचालक पदपथाला लागून असलेल्या जागेत अापली वाहने लावत असली तरी अनेक चारचाकी चालक या दुचाकींच्या मागे अापली वाहने लावत असल्याचे चित्र अाहे. परिणामी या ठिकाणी डबल पार्किंग हाेत असून वाहतूकीला अडथळा निर्माण हाेत अाहे. ज्या ठिकाणी चारचाकीसाठी जागा अारक्षित अाहे त्या ठिकाणी काही नागरिक दुचाकीसुद्धा लावत असल्याने नक्की येथे कुठले वाहन लावयाचे याबाबत वाहनचालक गाेंधळून जात आहेत. काही ठिकाणी नुसती पार्किंगची पाटी असल्याने येथे दुचाकी लावायची चारचाकी याबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण हाेत असल्याचेही चित्र अाहे. तसेच जेथे कार पार्किंग अाहे तेथे रस्त्याला समांतर गाडी लावायची कि सरळ गाडी लावायची याबाबत वाहनचालकांमध्ये जागृती नसल्याचे दिसून येते. त्यामुळे कशाही प्रकारे याठिकाणी गाड्या लावल्या जात अाहेत. 

    जंगली महाराज रस्त्याच्या नव्या रचनेमुळे हा रस्ता वाहतूकीसाठी अरुंद झाला अाहे. पदपथांची रुंदी वाढविल्यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या कमी झाली अाहे. नव्या रचनेत पार्किंगसाठी पुरेशी जागा मिळाली नसल्याने वाहनचालक कशाही प्रकारे वाहने लावत अाहेत. खासकरुन डबल पार्किंगचे प्रकार नित्याचेच झाले अाहेत. पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात अालेल्या दुचाकींच्या मागे चारचाकी वाहने पार्क केली जात अाहे. त्यामुळे दुचाकी चालकांना वाहन काढणे अवघड जाते. काही ठिकाणी केवळ स्कूलबस अाणि रिक्षांसाठी जागा अारक्षित करण्यात आली अाहे. तेथेही चारचाकी चालक वाहने लावली जात अाहेत. डबल पार्किंग करणाऱ्यांवर वाहतूक शाखेकडून विशेष कारवाई हाेत नसल्याने दुचाकींच्या मागे चारचाकी लावण्याचा येथे पायंडाच पडला अाहे. या डबल पार्किंगमुळे अाधिच अरुंद झालेला रस्ता अधिक अरुंद हाेत असून सकाळ व संध्याकाळच्यावेळी याठिकाणी वाहतूक काेंडी हाेत अाहे. त्यामुळे वाहनचालकांचा वाहन लावण्याबाबतचा संभ्रम दूर हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाParkingपार्किंग