शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जप्त भाजीपाला होतोय परस्पर गायब, कोथरूड क्षेत्रीय कार्यालयामधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 03:26 IST

कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत होणाऱ्या अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त केलेला भाजीपाला फळे तसेच इतर साहित्य आपोआप नाहीसे होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हातावर पोट असणारे आनेक गरीब विक्रेते मेटाकुटीला आले आहेत. याला जबाबदार कोण, असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे.

कर्वेनगर - कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत होणाऱ्या अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त केलेला भाजीपाला फळे तसेच इतर साहित्य आपोआप नाहीसे होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हातावर पोट असणारे आनेक गरीब विक्रेते मेटाकुटीला आले आहेत. याला जबाबदार कोण, असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे.महापालिकेतर्फे अतिक्रमण कारवाई नागरिकांच्या हितासाठी होत असते आणि अतिक्रमण कारवाईमुळे रस्ते, पदपथ अगदी मोकळे होत आहेत. त्यामुळे नागरिकांना पदपथावर चालताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. वाहतूककोंडी होत नाही, सुखरूप प्रवास होतोे. महापालिकेचे या धडाकेबाज कारवाईबाबत नागरिकाकडून कौतुकही होत आहे.महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई केल्यानंतर ठराविक वेळेत व्यावसायिकांना दंडात्मक कारवाई करून माल परत देतो. पण, कमीच माल परत मिळत असल्याने छोटे व्यावसायिक महापालिका प्रशासनावर अत्यंत नाराज आहे. हा माल कसा गुप्त होतो, याबाबत अनेक शंका जन्माला येतात; पण संबंधित यंत्रणेने त्यात लक्ष घालावे, अशी मागणी व्यावसायिक करीत आहेत.माल परत मिळतच नाही...रोजीरोटीसाठी रस्त्यावर बसणाºया छोट्या व्यवसायिकावर पालिका नियमानुसार कारवाई करते. कायदेशीर प्रक्रिया करून अनेक व्यावसायिकांना जप्त केलेला माल- वस्तू परत देते; पण भाजीपाला, फळे परत घेताना दंडाच्या किमतीएवढाही माल परत मिळत नाही किंवा जप्त केलेल्या अर्धा मालदेखील परत मिळत नाही, असे एका आंबेविक्रेत्याने नाव न छापण्याचा अटीवर सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या