शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

उद्घाटनाआधीच जागेवरून महापालिकेत मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 03:53 IST

महापालिकेच्या विस्तारीत इमारतीचे काम अपूर्ण असतानाही उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते इमारतीचे २१ जूनला उद््घाटन होत आहे.

पुणे - महापालिकेच्या विस्तारीत इमारतीचे काम अपूर्ण असतानाही उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते इमारतीचे २१ जूनला उद््घाटन होत आहे. या कार्यक्रमासाठी विश्वासात घेतले नसल्याची विरोधकांची तक्रार असून, उद््घाटनाआधीच जागेच्या नियोजनावरून मतभेद निर्माण होत आहेत. नव्या इमारतीमध्ये विरोधक व सत्ताधारी यांची दालने खाली व वर अशी केली असल्यावरून मतभेद निर्माण झाले असल्याची चर्चा महापालिकेत आहे.सध्याच्या इमारतीशेजारीच ही नवी इमारत बांधली आहे. त्यात भले मोठे आलिशान सभागृह आहे. सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागहापेक्षा त्याची क्षमता जास्त असून, त्यात अत्याधुनिक यंत्रसामग्रीही बसवण्यात आली आहे. मात्र या इमारतीचे बरेच काम अजून बाकी आहे. त्यात फर्निचर तसेच विद्युतकामाचाही समावेश आहे. सभागृहाचे काम कसेबसे पूर्ण करून त्याचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण करण्याचा घाट महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने घातला आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट व्हायच्या आत हा कार्यक्रम करण्याची घाई केली जात असून, त्यामुळेच विरोधकांमध्ये बेचैनी आहे.काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनी यासंदर्भात बुधवारी महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील समजला नाही, मात्र त्यात उद््घाटनाच्या कार्यक्रमाविषयी विश्वासात घेतले नाही, अशी तक्रार करण्यात आली असल्याचे समजते. गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा व्हावी, त्यात प्रमुख पाहुणे ठरवावेत अशी प्रथा, संकेत असतानाही परस्पर कार्यक्रम ठरवणे योग्य नाही, असे मत गटनेत्यांनी व्यक्त केले असल्याचे समजते.त्याचबरोबर या नव्या इमारतीमध्ये गटनेत्यांची जागा खालील मजल्यावर व महापौरांची जागा वरच्या मजल्यावर, अशी रचना आहे का, अशी विचारणा गटनेत्यांनी महापौरांना या भेटीदरम्यान केली. सध्याच्या इमारतीत सर्व पदाधिकारी एकाच तिसºया मजल्यावर आहेत. तसेच नव्या इमारतीमध्येही असावे. गटनेते खालील मजल्यावर व महापौर वर, असे असेल तर एकत्रित बैठका, चर्चा करणे अवघड होईल, असे मत या नेत्यांनी महापौरांजवळ व्यक्त केले. महापौरांनी त्यांना २१ जूनला फक्त सभागृहाचे लोकार्पण होईल, इमारतीमधील जागा नंतर निश्चित केल्या जातील, त्या वेळी गटनेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे समजते.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाnewsबातम्या