शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विरंगुळा केंद्र वापराविना पडून, बाणेरमधील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 03:42 IST

बाणेरमधील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन होऊनही रस्त्याअभावी ते धूळ खात पडून आहे. ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील काही साहित्य चोरीला गेले असून, केंद्राच्या परिसराची व इमारतीची दुरवस्था झाली आहे.

बाणेर : बाणेरमधील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन होऊनही रस्त्याअभावी ते धूळ खात पडून आहे. ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील काही साहित्य चोरीला गेले असून, केंद्राच्या परिसराची व इमारतीची दुरवस्था झाली आहे.बाणेरमधील साईदत्त सोसायटीलगत सर्व्हे नंबर १६७ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन मजली विरंगुळा केंद्र बांधण्यात आलेआहे. या इमारतीसाठी दोन कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.विरंगुळा केंद्राचा रस्त्याची जागा व सोसायटी यांच्यामध्ये सुरक्षा भिंत नाही. यामुळे ही जागा सोसायटीचाच एक भाग झाली आहे.विरंगुळा केंद्राकडे जाणाºया रस्त्याच्या जागेवार सोसायटीचे खासगी गेट आहे. खासगी सुरक्षारक्षक असल्याने विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांना वापरता येत नाही. विरंगुळा केंद्रामध्ये सांस्कृतिक हॉल, पहिल्या व दुसºया मजल्यावर दोन कक्ष बांधण्यात आले आहेत. परंतु विरंगुळा केंद्राच्या फरशी, स्वच्छतागृह, तसेच पाणी व्यवस्था आदी कामे अपूर्ण आहेत. विद्युत व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. कामअपूर्ण असल्याने याचा वापर करता येत नाही.या इमारतीचे उद्घाटन विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते ४ जानेवारी २0१७ रोजी करण्यात आले होते. परंतु प्रशासकीय उदासीनतेमुळे विरंगुळा केंद्राचे उद्घाटन होऊनही अद्याप विरंगुळा केंद्र सुरू झाले नाही. विरंगुळा केंद्रामध्ये जाण्यासाठी स.नं. १६७ लगत रस्ता नकाशामध्ये उपलब्ध आहे. परंतु प्रत्यक्षात या रस्त्यावर खासगी सोसायटीचा ताबा असल्याने विरंगुळा केंद्रात जाता येते नाही.ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन होणे अपेक्षित होते. परंतु प्रशासनाने घाईत उद्घाटन उरकल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होणार नाही तसेच राहिलेले अपूर्ण कामे लवकर पूर्ण करून विरंगुळा केंद्र वापरात येण्यासाठी प्रयत्न करू.- ज्योती कळमकर, नगरसेविकाज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रामध्ये अनेक अडचणी आहेत. परंतु अडचणी दूर करून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र वापरता येईल, यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. - स्वप्नाली सायकर, नगरसेविकाविरंगुळाच्या उर्वरित कामासाठी येत्या आर्थिक वर्षात तरतूद करून राहिलेली कामे पूर्ण करण्यात येतील. यानंतर विरंगुळा केंद्र सर्वांसाठी खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भवन विभागाचे अभियंता मंदार धायगुडे म्हणाले, की बाणेर येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र अ‍ॅमिनिटी स्पेसमध्ये उभारण्यात आले आहे. यासाठी ९ मीटरचा रस्ता आहे. हा रस्ता सुरू करण्यात येईल. आर्थिक वर्षात उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. कामे पूर्ण करून विरंगुळा केंद्र वापरायोग्य करण्यात येईल. - अमोल बालवडकर, नगरसेवक