शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

संस्कारांतून मिळाला कॉन्फिडन्स

By admin | Updated: March 8, 2015 01:07 IST

‘‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’’......आईची महती खरंच कुणीच शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ती असते संस्कारांची शिदोरी...सदैव साथ देणारी प्रेमाची सावली...

उषा काकडे, कोमल काकडे‘‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’’......आईची महती खरंच कुणीच शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ती असते संस्कारांची शिदोरी...सदैव साथ देणारी प्रेमाची सावली... प्रत्येक मुलाच्या मनात आईचे स्थान काय आहे....किंवा आईसाठी आपले मूल काय आहे, ते त्या भावस्पर्शी नात्यातूनच कळते....आज अर्थार्जनासाठी नोकरीबाहेर पडणाऱ्या महिलांना ‘सुपरमॉम’ म्हटले जात असले अथवा एक यशस्वी उद्योजिका, नामवंत व्यक्ती म्हणून तिचा समाजात वावर असला तरी ती सर्वप्रथम एक ‘आई’ असते याची जाणीव तिच्या मनात सतत जागृत असते....म्हणूनच आई-मुलाचे नाते म्हणजे मनाशी न तुटणारी नाळ असते...या भावनिक नात्याची उकल करत होत्या यशस्वी उद्योजिका उषा काकडे. यशस्वितेच्या शिखरावर असूनही ‘आईपण’ जपणारी..... मुलीशी मैत्रीपूर्ण नाते दृढ करणारी ‘मैत्रीण’ अशी त्यांची सुंदर रूपं समोर आली. .....मैत्रिणींपेक्षा आईची कंपनी जास्त भावते असे दिलखुलासपणे सांगणाऱ्या ‘कोमलमध्ये संस्कारक्षम मुलीचे दर्शन घडले. हल्लीच्या जगात ‘संस्कार’ हा शब्द काहीसा हद्दपार झाला असला तरी आमच्या कुटुंबाची भिस्त याच तीन शब्दांवर उभी आहे. संस्कृती हा कुटुंबाचा कणा आहे. त्यामुळे ती संस्कृती जपणे...थोरामोठ्यांचा सन्मान करणे..सणांमध्ये सहभागी होणे...हे संस्कार लहानपणापासूनच मुलांवर घडविले.. सगळ्यांना घेऊन पुढे जाणे, पहिल्यांदा दुसऱ्यांचा विचार करणे. प्रामाणिकपणा, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारीही ठेवलीच पाहिजे. याची जाणीव तिला दिली. तिची आई होण्यापेक्षा तिची मैत्रीण होण्याचा मी प्रयत्न केला...त्यात यशस्वीही झाले...या आईच्या म्हणण्याला कोमलही दुजोरा देत होती. ‘आई माझी नुसती मैत्रीणच नाही तर जिवाभावाची एक सखी आहे. एकमेकींशी मनमोकळा संवाद साधणे... प्रत्येक गोष्ट शेअर करणे... या गोष्टींमुळे आमच्यात मस्त बॉण्डिंग तयार झाले आहे. व्यस्त कामातही आई कुटुंबाला नेहमीच वेळ देते. आमच्या आवडीनिवडीदेखील खूप सारख्या आहेत. मुळात आमच्या दोघींमधले साम्य म्हणजे आम्हाला ‘हसायला’ खूप आवडते. इतके की शेवटी आता बास! असे एकमेकींनाच म्हणावे लागते. तिला थोडा निवांत वेळ मिळाला की आम्ही दोघीच ड्रायव्हिंगला जातो...बुद्धीबळ खेळतो. सकाळी हमखास आम्ही चौघे जण एकत्रितपणे चहा-नाष्टा करतो. तिच्या हातचा आणि तिने भरविलेला वरण-भात मला जास्त आवडतो. एक गृहिणीपासून यशस्वी महिलेपर्यंतचा तिचा प्रवास मी जवळून अनुभवला आहे. त्यामुळे तिच्याबद्दल मनात खूप आदर आहे. कितीही व्यस्त शेड्यूल असो, मी फोन केला तरी आई तो उचलणारच. आई कितीही थकूनभागून घरी आली आणि मी आई तुझ्या हातची विशिष्ट डिश खायची इच्छा आहे, असे म्हटले तरी न कंटाळता ती मला खायला घालणार. माझ्या आवडीनिवडी तिला छानपणे आपल्या आईबद्दल कोमल भरभरून बोलत होती. ‘स्वयंपाक’ करण्याची आवड मला आईमुळेच लागली. आता तिला कामाच्या व्यापामुळे किचनमध्ये जायला वेळ मिळत नाही, ती कसर कधी कधी मी भरून काढते. आईला तिच्या वाढदिवसाला ‘सरप्राईज’ म्हणून मेथीची भाजी करून दिली असल्याची आठवणही कोमलने सांगितली. आईच्या हातचा मला ‘मटण खिमा’ जाम आवडतो, तर कोमलच्या हातची वांग्याची भाजी मला विशेष भावते, असे उषाताई सांगतात. कोमलमध्ये माझ्यासारखीच एक बिझनेस वुमन दडलेली आहे. ती निश्चितच एक यशस्वी उद्योजिका होऊ शकते, असे उषाताई अभिमानाने सांगतात. मीटिंगमध्ये जर कधी ती बसली तर ती सगळ्या गोष्टींचे अचूकपणे निरीक्षण करत असते. त्यातील बारकावे आपणहून विचारत असते. याचे मला आई म्हणून खूप कौतुक वाटते. तिचा स्वभाव मुळातच खूप गोड आहे. तिला ज्या गोष्टीमध्ये रस आहे, ते तिने आवडीने करावे, हीच गोष्ट करायला हवी यासाठी कधीही आग्रह धरला नाही. कोणताही निर्णय घ्यायचा असो आम्ही एकत्रितपणे घेतो. आज काकडे कुटुंबीयांकडे समाजात मानाने पाहिले जाते.