शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारीची कुलगुरूंकडूनच टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 03:00 IST

विविध प्रश्न घेऊन कुलगुरूंकडे येणा-या विद्यार्थ्यांना भेट देण्यासही कुलगुरूंकडून नकार दिला असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

पुणे - एका इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये परीक्षेच्या दरम्यान घडत असलेले गैरप्रकार, बेकायदेशीर नेमणुका, आर्थिक गैरप्रकार याची माहिती देण्यासाठी कुलगुरू कार्यालयात आलेल्या त्या महाविद्यालयाच्या माजी कार्यालयीन अधीक्षकला कुलगुरू, प्र-कुलगुरू, परीक्षा विभागाचे प्रमुख, उपकुलसचिव व पुन्हा कुलगुरू कार्यालय असे गेले २० दिवस फेऱ्या मारायला लावून टोलवाटोलवी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. त्याचबरोबर विविध प्रश्न घेऊन कुलगुरूंकडे येणा-या विद्यार्थ्यांना भेट देण्यासही कुलगुरूंकडून नकार दिला असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.नºहे येथील एका इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये योगेश ढगे हे कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत होते. महाविद्यालयातील काही बेकायदेशीर बाबींना कंटाळून मी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये घडत असलेल्या या गैरप्रकारांना वाचा फुटावी यासाठी त्यांनी कुलगुरूंकडे धाव घेतली असता अत्यंत वाईट अनुभवाला सामोरे जावे लागल्याची तक्रार योगेश ढगे यांनी केली आहे.योगेश ढगे यांनी सांगितले, मी गेल्या दहा वर्षांपासून इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये नोकरी करीत होतो. सुरुवातीला मी अकाऊंट म्हणून काम केले, त्यानंतर अधीक्षक म्हणूनही मी काम पाहिले. त्यामुळे महाविद्यालयांमधील बहुतांश आर्थिक व्यवहार, कामकाज याची मला जवळून माहिती आहे.परीक्षा विभागातील गैरप्रकारांची माहिती देण्यासाठी मी १८ जून २०१८ रोजी कुलगुरू कार्यालयामध्ये जाऊन डॉ. नितीन करमळकर यांची भेट मागितली. त्या वेळी कुलगुरूंना कोणत्या गैरप्रकारांबाबत माहिती द्यायची आहे, याचा लेखी तक्रार अर्ज कार्यालयामध्ये दिला होता. मात्र कुलगुरूंनी त्यांना भेट देण्यास नकार देऊन प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार प्र-कुलगुरूंच्या कार्यालयामध्ये असता तिथेही त्यांना परीक्षा विभागाचे प्रमुख अशोक चव्हाण यांना भेटण्यास सांगितले. चव्हाण यांनी उपकुलसचिव प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे पाठविले. त्यानंतर कुलगुरूंकडे जा असे मला सांगण्यात आले. अखेर २७ जून २०१८ रोजी कुलगुरूंनी भेट देऊन याप्रकरणी चौकशी समिती नेमली असल्याची जुजबी माहिती दिली. कुलगुरूंकडे महाविद्यालयांमधील व कॅम्पसच्या विभागांमधील विद्यार्थी, शिक्षक त्यांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी घेऊन भेटण्यास येत असतात. अनेक विद्यार्थी बाहेरगावाहून येत असतात. मात्र, बहुतांश वेळा कुलगुरूंकडून विद्यार्थ्यांना भेटण्यास नकार दिला जातो. त्यांना प्र-कुलगुरू, कुलसचिव किंवा उपकुल सचिवांना भेटण्यास सांगितले जाते. मात्र, विद्यार्थी तिथे गेले असता तिथूनही जुजबी माहिती देऊन परत पाठविले जाते.२४ तास उपलब्ध राहण्याचे काय?डॉ. नितीन करमळकर यांनी कुलगुरू पदाचा कार्यभार घेतल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी २४ तास उपलब्ध राहणार असल्याच्या मुलाखती दिल्या होत्या. मात्र अनेक विद्यार्थी त्यांच्या तक्रारी घेऊन कुलगुरूंकडे गेले असता त्यांना भेट नाकारली जात आहे. त्यामुळे कुलगुरूंच्या २४ तास उपलब्ध राहण्याच्या आश्वासनाचे काय झाले, अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.फोन उचलण्यासही टाळाटाळनगर जिल्ह्यातील सिनेट सदस्यांना एका महत्त्वाच्या विषयाबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी बोलायचे होते. त्यासाठी ते दोन दिवसांपासून त्यांच्या फोनवर संपर्क साधत होते. मात्र त्यांचा फोनच उचलला गेला नाही. त्यामुळे त्यांनी अखेर पुण्यातील त्यांच्या एका मित्राला कुलगुरू कार्यालयात पाठविले. त्या मित्राने कुलगुरूंच्या स्वीय सहायकाची भेट घेतल्यानंतर सिनेट सदस्यांचा कुलगुरूंशी संपर्क झाला.कुलगुरूंना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांचा ठिय्यापीएचडी व एम.फिल.च्या विद्यार्थ्यांचे बंद केलेल्या विद्यावेतनाच्या प्रश्नावर ४ दिवसांत तोडगा काढू, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते. मात्र १५ दिवस उलटले तरी त्याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने सोमवारी याबाबत त्यांना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ गेले होते. मात्र भेटण्यास नकार दिला. त्यामुळे कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर कुलगुरूंनी धावती भेट घेतली. विद्यावेतनाबाबतचे परिपत्रक दोन दिवसांत संकेतस्थळावर टाकले जाईल, असे सांगितले.योगेश ढगे यांना भेटण्यास नकार देण्यात आला, या त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही. याप्रकरणी चौकशी समिती नेमली असल्याने त्यांना भेटलो नाही. ढगे यांना त्यांचे म्हणणे समितीसमोर मांडण्यासाठी बोलाविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनाही मी उपलब्ध असतो.- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठnewsबातम्या