शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पेस्ट कंट्रोल व्यावसायिकावर गुन्हा दाखल

By admin | Updated: December 13, 2015 23:47 IST

यमुनानगर येथे घरात केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळे श्वास गुदमरून युवक-युवतीचा गुदमरून मृत्यू झाला होता. पेस्ट कंट्रोल चालकाने घरात पेस्ट कंट्रोल करताना प्राणघातक औषधींचा

पिंपरी : यमुनानगर येथे घरात केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळे श्वास गुदमरून युवक-युवतीचा गुदमरून मृत्यू झाला होता. पेस्ट कंट्रोल चालकाने घरात पेस्ट कंट्रोल करताना प्राणघातक औषधींचा वापर प्रमाणात केला नाही. तसेच या व्यवसायाचे त्याने कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. व्यवसायाचा शासकीय परवाना नाही, असे पोलिसांना तपासात आढळून आल्याने त्यांनी पेस्ट कंट्रोल करणारे व्यावसायिक लक्ष्मण जगन्नाथ वाळुंज (रा. कोथरूड, पुणे) याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निगडीतील यमुनानगरमध्ये ३१ आॅक्टोबर रोजी शंकर लगडिया यांच्या घरी पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात आले होते. त्याच दिवशी सायंकाळी लगडिया यांचा मुलगा धवल लगडिया (वय २४) त्याची मैत्रीण मंदिरा रामलाल चौधरी (वय २६, रा. तळेगाव) हिला घरी घेऊन आला होता. या वेळी घरात दोघे एकटेच होते. काही वेळाने दोघांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. मात्र, उपचारादरम्यान धवलचा त्याच दिवशी, तर मंदिराचा दुसऱ्या दिवशी सकाळी मृत्यू झाला होता. तपासाधिकारी मधुकर थोरात यांना पेस्ट कंट्रोल व्यावसायिकाने घरात पेस्ट कंट्रोल करताना जी प्राणघातक औषधी, रसायने वापरली, ती प्रमाणापेक्षा जास्त वापरली असल्याचे आढळून आले. हा व्यवसाय टाकण्यासाठी कृषी पदवीचे शिक्षण गरजेचे आहे, प्रशिक्षण घेणे गरजेचे असून, शासनाची परवानगी असणे गरजेचे आहे. त्याने कुठल्या प्रकारचे शिक्षण घेतले नसून, शासनाची परवानगीही घेतली नाही. बेकायदेशीर व्यवसाय करून मृत्यूस जबाबदार धरले आहे. (प्रतिनिधी)