शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

स्पर्धा परीक्षांच्या दुकानदारीने विद्यार्थ्यांची कोंडी

By admin | Updated: April 15, 2017 03:43 IST

मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले कोचिंग देण्याच्या आमिषाला बळी पाडून त्यांच्याकडून लाखो रूपयांची

- दीपक जाधव, पुणे

मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले कोचिंग देण्याच्या आमिषाला बळी पाडून त्यांच्याकडून लाखो रूपयांची फी उकळली जात आहे. अमूक प्रकारे तयारी करून घेऊ, चांगल्या नोटस देऊ अशा भूलथापा देऊन प्रवेश घ्यायला लावला जातो, पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या वाटयाला घोर निराशा येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या फिवर देखील शासनाकडून नियंत्रण आणले जाण्याची आवश्यकता विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये दररोज शेकडो विद्यार्थी आपले नशीब अजमावण्यासाठी येतात. स्वत:च्या गुणवत्तेच्या जोरावर चांगली नोकरी, पद आणि प्रतिष्ठा मिळविण्याचे स्पर्धा परीक्षा हे विद्यार्थ्यांसाठी एकमेव साधन उरलेले आहे. पुणे शहरामध्ये किमान ३ लाख विद्यार्थी वेगवेगळया स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या सुपर क्लास वन, क्लास वन पोस्टसह विविध सरकारी विभागांमध्ये निघणाऱ्या व्दितीय, तृतीय श्रेणीतील नोकऱ्यांच्या स्पर्धा परीक्षांची विद्यार्थी तयारी करतात.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा २००८ नंतर नियमितपणे होण्यास सुरूवात झाली. यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा मोठया प्रमाणात वाढला आहे. विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांकडे वाढलेला कल लक्षात घेऊन त्याचे अनेक क्लोचिंग क्लासेस शहरात उभे राहिले. राज्यसेवा परीक्षांच्या केवळ ७-८ महिन्यांच्या कोर्ससाठी ९० हजार ते १ लाख रूपयांची तर युपीएससीच्या कोचिंगसाठी १ लाख ते सव्वा लाख रूपयांची अवाजवी फि या क्लासेसकडून आकारली जात आहेत. नोटस, पुस्तकांसाठी आणखी वेगळे पैसे घेतले जातात. इतका खर्च करूनही प्रत्यक्षात क्लासमधून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. मात्र क्लासेसवाल्यांनी एकाचवेळी सर्व फी भरून घेतली असल्याने त्यांना तक्रार करता येत नाही. विद्यार्थ्यांकडून मोठयाप्रमाणात घेतल्या जात असलेल्या या फिच्या जोरावर एका क्लासच्या शहरात व शहराबाहेर अनेक शाखा उभ्या राहत आहेत. त्यांच्या एका शाखेमध्ये दिवसाला ४ ते ५ बॅच घेतल्या जातात. एका बॅचमध्ये किमान १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. स्पर्धा परीक्षांच्या जंजाळात विद्यार्थ्यांना बुडवून बाहेर काढण्याचे मशीन्स हे क्लास बनत चालले आहेत. क्लासेसकडून भपकेबाजपणा दाखवून अनेक भूलथापा विद्यार्थ्यांना मारल्या जातात, या भपकेबाजपणाला विद्यार्थी बळी पडत असून क्लास लावल्याशिवाय आपण पास होऊ शकणार नाही अशी त्यांची मानसिकता बनत आहे. (प्रतिनिधी)आर्थिक ओढाताणीने घुसमटस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याच्या आकांक्षाने खेडयापाडयातील असंख्य तरूण पुण्यात येतात. क्लास लावल्यानंतच यश मिळते अशी एक मानसिकता तयार झाली आहे. मोठी ओढाताण करून, अनेकदा छोटया-मोठया नोकऱ्या करून ते क्लासची फि जमा करतात. त्याचबरोबर पुण्यात राहण्याचा वाढता खर्च, प्रचंड स्पर्धा, त्यासाठीचा अभ्यास याचा मेळ त्यांना घालावा लागत असल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.विद्यार्थींच क्लासचे शिक्षक- अयशस्वी ठरलेले बनतात मार्गदर्शक - क्लासची जाहिरात करताना मात्र अमुक प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असे सांगितले जाते.- प्रत्यक्षात मात्र त्या शिक्षकांचे कधीतरीच विद्यार्थ्यांना दर्शन होते. स्पर्धा परीक्षांची अनेक दिवसांपासून तयारी करीत असलेले विद्यार्थीच क्लासेसमध्ये शिक्षक नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे लाखो रूपयांची फि भरून क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरात फारस पडत नाही.