शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बस जळीतकांड प्रकरणी कंपनी मालकाची चौकशी; हिंजवडी पोलिसांकडून तपास सुरू

By नारायण बडगुजर | Updated: March 24, 2025 00:13 IST

हिंजवडी आयटी पार्कमधील बस जळीत कांडप्रकरणी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली.

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमधील बस जळीत कांडप्रकरणी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली. बसचालकाला बेंझिन केमिकल कसे मिळाले, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आसन बसविण्यात आले होते का, असे प्रश्न पोलिसांकडून विचारत चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

हिंजवडी आयटी पार्कमधील व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या बसचा चालक जनार्दन हंबर्डीकर याचे बसमधील काही कर्मचार्‍यांशी कंपनीत वाद होत असत. तसेच दिवाळीत कंपनीने त्याला पगारवाढही दिली नव्हती. त्याचा राग हंबर्डीकर याच्या डोक्यात होता. त्याने व्योमा ग्राफिक्स या आपल्या कंपनीतूनच बेंझिन सोल्युशन नावाचे केमिकल एक प्लास्टिकच्या बाटलीत भरून गाडीत चालकाच्या आसनाखाली आणून ठेवले आणि भयंकर हत्याकांड घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, नितीन शाह यांनी या घटनेबाबत माध्यमांशी संवाद साधला. या घटनेचा आम्हाला प्रचंड धक्का बसला आहे. या धक्क्यातून आम्ही अद्याप बाहेर आलेलो नाही. पोलिसांचा तपास सुरू असून पोलिसांना आमचे पूर्ण सहकार्य आहे. आम्ही जखमींना देखील योग्य मदत करत आहोत. आम्ही प्रत्येकाची काळजी घत आहोत. यातील काही कामगार आमच्याकडे १९८५ पासून तर काही कामगार २००६ सालापासून काम करीत आहेत. कंपनीने बसचालकाचा पूर्ण पगार दिला आहे. कधीही त्याचा पगार थकवलेला नाही, असा दावाही शाह यांनी केला.‘हे’ प्रश्न विचारले?सामान्यांना न भेटणारे घातक बेंझिन केमिकल कंपनीतून चोरीला कसे गेले ? यात कंपनीचा निष्काळजीपणा कसा झाला? टेम्पो ट्रव्हलर बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सीट (आसन) बसविण्यात आले होते का? बसचालक हंबर्डीकर याला बोनस किती दिला होता? पगार थकवला होता का? बसचालकाने कोणाबाबत काही तक्रारी केल्या होत्या का? त्याच्याबाबत इतर कामगारांनी तक्रारी केल्या होत्या का? तक्रारींची वेळीच दखल का घेतली नाही, असे प्रश्न विचारत पोलिसांनी नितीश शाह यांच्याकडे चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे.