शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पुणे शहराच्या विकासासाठी कटिबद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:53 IST

पुणे महापालिकेत प्रथमच भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने विजयी झाली अन् पक्षाने सत्ता स्थापन केली. या भारतीय जनता पक्षाच्या सत्तेतील पहिल्या महापौर होण्याची संधी मला मिळाली.

मुक्ता टिळकपुणे महापालिकेत प्रथमच भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने विजयी झाली अन् पक्षाने सत्ता स्थापन केली. या भारतीय जनता पक्षाच्या सत्तेतील पहिल्या महापौर होण्याची संधी मला मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय असून, विविध पदांवर कामेदेखील केली आहेत. परंतु देशाची सांस्कृतिक राजधानी, आयटी सिटी असलेल्या पुणे शहराच्या प्रथम नागरिक हा माझ्यासाठी सर्वोच्च बहुमान आहे. या शहराचा नावलौकिक वाढविणे व विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.राजकीय वारसा असलेल्या घरातच सून म्हणून गेले आणि घराचा वारसा पुढे चालूठेवला. आरक्षणामुळे महिलांना राजकारणातसंधी मिळाली. तशीच मलादेखील सन २००२च्या महापालिका निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. त्यापूर्वी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरूच होते. परंतु नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर राजकारणाच्या माध्यमातून समाजकराण करण्यावर अधिक भर दिला. टिळक घराला राजकीय वारसा असलातरी मला मात्र सहजासहजी काही मिळालेनाही. प्रत्येक वेळी सर्वसामान्य राजकारण्यांनाजे कष्ट, संघर्ष करावा लागतो तो मलादेखील करावा लागला. परंतु घरामध्ये निर्णयाचे पूर्णपणे स्वातंत्र्य होते. याचा नगरसेवकआणि आता महापौर म्हणून काम करताना खूप फायदा होतोय.गेल्या एक वर्षापासून पुण्याच्या महापौर म्हणून काम करतेय. या पदामुळे एका वर्षातखूप काही शिकायला मिळाले. विरोधकांची मानसिकता, जनतेच्या अपेक्षा आणि विकासापेक्षा सामाजिक भावनेला दिलेले अधिक महत्त्व आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न, या सर्व गोष्टी सांभाळून आपले काम करणे खरी तर मोठीकसरत असते. असे असताना माझा वपक्षाचा नेहमीच सकारात्मक दृिष्टकोन ठेवला आहे. त्यामुळेच शहराच्या विकासासाठी महापालिका प्रशासनाला शिस्त लागावी, शहराच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निणर्य घेण्यावर अधिक भर दिला आहे. हे करताना अनेकदा सहकारी व नागरिकांची मानसिकता सांभाळण्याचे मोठे आव्हान असते. शहराच्या विकासासाठी अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. यामध्ये पुणे शहराची वाहतूककोंडीतून सुटका करणे हा आमचा महत्त्वाचा अजेंडा आहे. यासाठीच मेट्रो, बीआरटी, सायकलिंग यांसारख्या योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. नदी सुधार प्रकल्प असो की २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्याचा विषय, भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराचा विकास व सर्वसामान्य पुणेकरांना जास्तीतजास्त चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत व पुढेदेखील करत राहू.आरक्षणामुळे महिलांना राजकारणात संधी मिळत आहेत. परंतु या क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमता स्वत:मध्ये निर्माण केल्या पाहिजेत. यासाठी फिल्डवर असताना, काम करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना थोडी अभ्यासाची जोड दिली तर चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आपल्या प्रभागातील, शहराचे सामाजिक प्रश्न काय आहेत या सर्व गोष्टीचादेखील अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे राजकारणातदेखील यशस्वी होण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही.भारतीय जनता पक्षात काम करताना आतापर्यंत विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. राजकारणात काम करताना मी पदापेक्षाही पक्षाला अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे यापुढे देखील पक्ष देईल ते जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार.