शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आयुक्तांची पालकांना मनाई; कार्यालयात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 03:00 IST

शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी पालकांना भेट देण्यास मनाई केल्याने सोमवारी शिक्षण आयुक्त कार्यालयात मोठा गोंधळ उडाला

पुणे : शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी पालकांना भेट देण्यास मनाई केल्याने सोमवारी शिक्षण आयुक्त कार्यालयात मोठा गोंधळ उडाला.शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी पुण्यात पालकांची मीटिंग घेतली असता प्राजक्ता पेठकर एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा प्राजक्ता पेठकर यांच्यासोबत त्यांची शाब्दिक चकमक उडाली होती. त्यामुळे त्यानंतर यापुढे प्राजक्ता पेठकर यांना कोणीही अधिकाऱ्यांनी भेटू नये, असे निर्देश कृष्णा यांनी दिले आहेत. सोमवारी पेठकर या सोळंकी यांना भेटण्यास गेल्या असता त्यांना भेट नाकारण्यात आली. त्यावरून मोठा गोंधळ उडाला.जनतेच्या प्रश्नांसंदर्भात अधिकाºयांची भेट घेणे हा आमचा घटनादत्त अधिकार असून तो हिरावून घेता येणार नाही, अशी भूमिका पालकांकडून घेण्यात आली. त्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयात मोठा गोंधळ उडाला. या वेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले; त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप प्राजक्ता पेठकर यांनी केला आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले, की शैक्षणिक बाबींमध्ये प्राजक्ता पेठकर यांना अधिकाºयांकडून नेहमी सहकार्य करण्यात आले आहे; मात्र त्यांनी सचिव वंदना कृष्णा यांच्याशी अर्वाच्य भाषेत संभाषण केले. त्यामुळे त्यांनी सचिवांची माफी मागितल्याशिवाय त्यांना आमचा कोणताही अधिकारी भेटणार नाही.’’अधिकाºयांना भेटणे हा पालकांचा अधिकार आहे, त्यांनी गैरवर्तणूक केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येऊ शकतो; मात्र भेट नाकारता येणार नाही. हा त्यांच्या घटनात्मक अधिकाराचा भंग असल्याने त्याविरोधात अधिकाºयांविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे प्राजक्ता पेठकर यांनी सांगितले. वंदना कृष्णा यांना भेटले असता त्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप पेठकर यांनी केला आहे.अधिकाºयांना भेटणे हा पालकांचा अधिकार आहे. त्यांनी गैरवर्तणूक केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येऊ शकतो; मात्र भेट नाकारता येणार नाही. हा त्यांच्या घटनात्मक अधिकाराचा भंग असल्याने त्याविरोधात अधिकाºयांविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार आहे.- प्राजक्ता पेठकर, अध्यक्षा प्राजक्ता पेठकर एज्युकेशन ट्रस्टप्राजक्ता पेठकर यांना अधिकाºयांनी नेहमी सहकार्य केले आहे. मात्र, त्यांनी सचिव वंदना कृष्णा यांच्याशी अर्वाच्य भाषेत संभाषण केले. सचिवांची माफी मागितल्याशिवाय त्यांना आमचा कोणताही अधिकारी भेटणार नाही.- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त

टॅग्स :Puneपुणे