शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

व्यावसायिक गेमर कमावतात ४५ हजारांपर्यंतचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:08 IST

पुणे : चारमधील एका गेमरला ऑनलाइन गेमिंग हा व्यवहार्य व्यवसाय वाटतो आणि हे या व्यवसायात आलेल्या बदलाचे प्रतीक म्हणता ...

पुणे : चारमधील एका गेमरला ऑनलाइन गेमिंग हा व्यवहार्य व्यवसाय वाटतो आणि हे या व्यवसायात आलेल्या बदलाचे प्रतीक म्हणता येईल. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या निर्बंधांमुळे गेमिंगच्या छंदाचे पूर्ण वेळ करियरमध्ये रुपांतर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. व्यावसायिक गेमर आज दरमहा ५ ते ४५ हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवतात.

ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन (एआयजीएफ) या भारतातील ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील सर्वोच्च संघटनेने ऑनलाइन ‘गेमिंग इज अ लाइफ स्कील’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. लोकप्रिय मोबाइल गेम २०१९ भारतीय मालिकेत प्रादेशिक अंतिम फेरीतील टीमने साडेपाच लाख रुपयांचे बक्षीस जिंकले होते.

पुण्यातले ८६ टक्के गेमर्स मोबाईल फोनवर ऑनलईन गेम्स खेळतात. त्याशिवाय शहरातील ५६ टक्के गेमर्स ऑनलाईन गेम्समध्ये सातत्याने खेळ जिंकण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करतात. यामुळे त्यांची विश्लेषणात्मक क्षमता विकसित होण्यास मदत झाल्याचे अहवालात म्हटले आहे. एकंदरीत ७६ टक्के गेमर्सच्या मते जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग सतत शोधावा लागत असल्याने विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित होतात. त्यांच्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त जणांना (५७ टक्के) असे वाटते, की कामाच्या ठिकाणी दिवसभर राहिल्यानंतर विकसित होणाऱ्या कौशल्यांप्रमाणेच ऑनलाइन गेम्स खेळताना एखाद्या व्यक्तीला आवश्यक कौशल्ये विकसित करता येतात.

ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोलंड लँडर्स म्हणाले की, निर्णायक विचारशक्ती, सर्जनशील विचारशक्ती, निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण ही सर्व कौशल्ये प्रत्येकाच्या आयुष्यात विकासासाठी महत्त्वाची असतात. या संशोधनाच्या मदतीने आम्ही ग्राहकांना मोबाइल गेमिंगचे मूल्य खरंच समजले आहे का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यातून गेमिंग हे लोकांना एकत्र येण्यासाठी, संवाद साधण्यासाठी व करियर उभारण्यासाठी उत्तम क्षेत्र असल्याचे लक्षात आले. आगरकर सेंटर ऑफ एक्सलन्सच्या (एसीई) संस्थापक फातेमा आगरकर म्हणाल्या, “शिक्षण-मनोरंजनाचा हा प्रकार विकसित होईल तसा गेमिंग हा स्मृती, विश्लेषणात्मक क्षमता, एकाग्रता आणि आकलनविषयक इतर कौशल्यांचा स्रोत बनेल. गेमर्स सेकंदापेक्षाही कमी अवधीत निर्णय घेत असल्यामुळे समस्या निराकरणासाठी जास्त चांगल्या प्रकारे सक्षम होतात असे दिसून आले आहे.”

चौकट

गेमिंगमुळे मिळणारी कौशल्ये

ऑनलाइन गेमर्सच्या मते गेमिंगमध्ये प्रतिक्षिप्त क्रिया, लॉजिक या सर्वांत महत्त्वाच्या दोन कौशल्यांचा समावेश असून त्याशिवाय निश्चय, जोखीम/परताव्यांचे आकलन आणि उत्तम स्मरणशक्ती ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. पुण्यातील ५३ टक्के गेमर्सनी अशा प्रकारची व्यावहारिक, जीवन कौशल्ये ऑफिसमध्ये एक पूर्ण दिवस व्यतीत करून शिकता येतात असे मत नोंदवले.