पुणे : शहरात गुरुवारी २ हजार ३९३ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. ४ हजार १३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही आता २५ हजार २२२ वर आली आहे़
आज दिवसभरात १२ हजार ७३८ जणांच्या तपासण्या केल्या आहेत. तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी १८़७८ टक्के इतकी आहे़ तर, दिवसभरात शहरात ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २५ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६६ टक्के आहे़
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ३०२ कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३७२ रुग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत २३ लाख २६ हजार ३०२ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी ४ लाख ५४ हजार ४५७ जण बाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख २१ हजार ६७२ कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आतापर्यंत शहरात ७ हजार ५६३ जणांचा मृत्यू झाला आहे़