पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचना आणि आरक्षणांची सोडत येत्या सात सप्टेंबरला होणार आहे. त्याची रंगीत तालीम मंगळवारी होणार आहे.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्यासाठी गेल्या आठवडाभरापासून निवडणूक विभागाची तयारी सुरू आहे. आरक्षण सोडतीची रंगीत तालीम मंगळवारी होणार आहे. प्रभागरचना जाहीर केल्यानंतर राखीव प्रभागांच्या जागांचे वाटप करणे आणि यासाठी चक्रानुक्रमे पद्धत अवलंबिली जाणार आहे. त्यानंतर महिला, पुरुष, मागासवर्ग आदी आरक्षणांचे ड्रॉ काढण्यात येणार आहेत. ही सोडत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. सोडतीचा निकाल संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. तसेच अंतिम प्रभागरचनांचे आराखडे, नकाशे सभागृहात लावण्यात येणार आहेत. तसेच ही सोडत शालेय मुलांच्या हस्ते काढण्यात आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी दिली.(प्रतिनिधी)
आरक्षण सोडतीची आज रंगीत तालीम
By admin | Updated: October 4, 2016 01:23 IST