शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

महाविद्यालयांचे शुल्क कमी झाले; शाळांचे केव्हा होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी केवळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. शाळांकडून विद्यार्थ्यांना दिल्या ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी केवळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. शाळांकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांचा लाभ विद्यार्थी घेत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून केवळ शैक्षणिक शुल्क (ट्यूशन फी)घेणे अपेक्षित आहे. शाळांनी ग्रंथालय शुल्क, जिमखाना शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, क्रीडा शुल्क, इतर उपक्रमांचे शुल्क आकारू नये, या मागणीसाठी पालकांनी वेळोवेळी आंदोलने केली. त्यावर राज्य शासनाने दोन वेळा अध्यादेश काढले, परंतु संस्थाचालकांनी या अध्यादेशांना न्यायालयात आव्हान दिले. तसेच न्यायालयाने शासनाच्या विरोधात निकाल दिल्याने सध्या पालकांना शंभर टक्के शुल्क भरावे लागत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील इतर विद्यापीठांनी शासन आदेशानुसार शुल्क कमी करण्याच्या सूचना संलग्न महाविद्यालयांना दिल्या. त्यामुळे महाविद्यालयीन शुल्क कमी झाले आहे. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक शुल्क भरावे लागत आहे; मात्र ज्या सुविधा विद्यार्थी घेत नाहीत,अशा बाबींचे शुल्क शाळांनी आकारणे संयुक्तिक नाही,असे वाटत असले तरी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शाळा शंभर टक्के शुल्क आकारत आहेत. राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून याबाबत दाद मागण्याचा विचार करत असल्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले होते; मात्र अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. पालकांना दोन ते तीन तासांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे हजारो रुपये शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे कोरोनामुळे आर्थिक संकटात अडकलेल्या पालकांना केव्हा दिलासा मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

--------------------------------

महाविद्यालयाच्या शुल्कात काही प्रमाणात कपात झाली; मात्र अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणाऱ्या खासगी शाळांच्या शुल्काबाबत शासनाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत दिल्ली, मध्यप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थानसह बहुतेक सर्व राज्यांनी आदेश काढत शाळांच्या शुल्कात पालकांना सवलत मिळवून दिली. शाळांच्या शुल्क कपातीबाबत तर्क विसंगत निर्णय घेण्यात राज्य सरकारचा कुणीच हात धरू शकणार नाही. एकूण शिक्षणमंत्री शुल्काबाबत पालकांची चेष्टा करत आहेत, असेच खेदाने म्हणावे लागेल.

- मुकुंद किर्दत, आप पालक युनियन

----------------