शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

फनी वादळावर या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा 'विजय' : वाचवले तीन लाख नागरिकांचे प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 09:05 IST

फनी चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घातल्यानंतर तिथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.या भागात अनेक मराठी अधिकारी काम करत असल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. यातील गंजाम नावाच्या जिल्ह्यात अवघ्या ३६ तासांमध्ये जिल्हा प्रशासनाने तीन लाख लोकांचे स्थलांतर केले. त्यांच्या या नियोजनामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकही जीवितहानीची घटना घडली नाही.

 

नेहा सराफ 

पुणे : फनी चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घातल्यानंतर तिथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.या भागात अनेक मराठी अधिकारी काम करत असल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. यातील गंजाम नावाच्या जिल्ह्यात अवघ्या ३६ तासांमध्ये जिल्हा प्रशासनाने तीन लाख लोकांचे स्थलांतर केले. त्यांच्या या नियोजनामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकही जीवितहानीची घटना घडली नाही. इतकेच नव्हे तर वादळ संपल्यावर अवघ्या दोन तासात या जिल्ह्यातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले. यामागे नियोजन होते महाराष्ट्रातील अहमदनगरचे सुपुत्र असलेल्या जिल्हाधिकारी विजय कुलंगे यांचे. 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फनी हे चक्रीवादळ शुक्रवारी (दि. ३) रोजी ओडिशा किनारपट्टीला धडकले. यावेळी ओडिशा प्रशासनाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. त्यांच्या या नियोजन आणि तात्काळ अंमलबजावणी प्रक्रियेची आखणी अत्यंत काळजीपूर्वक केली गेली. गंजाम जिल्ह्यात ५ तालुके वादळामुळे प्रभावित झाले होते. फनीबाबत हवामानखात्याने पाच दिवस आधी प्रशासनाला कळवले होते. त्यानुसार गंजाममधून नियोजन करून शेवटच्या दीड दिवसात तीन लाख नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर केले गेले. यातही प्राधान्याने गरोदर महिला,अपंग, वयोवृद्ध यांना हलविण्यात आले. यावेळी ५४० गरोदर महिलांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. यातील १५३ महिलांची तीन तारखेला प्रसूतीही झाली. प्रत्येक स्थलांतर स्थळी अन्न, पाणी, जनरेटर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवली होती. त्याकरिता 

आधीच स्थानिक भागातील केटरर्स सेवा देणाऱ्या व्यक्तींशी संपर्क करून ठेवण्यात आला होता. अनेक नागरिक सोबत आपली जनावरे किंवा पाळीव प्राणी घेऊन येत असल्याने त्यांनाही दाखल करून घेण्यात आले. या काळात सर्व माध्यमांचा आधार घेऊन कच्चा घरातून बाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले. शिवाय प्रत्यक्ष वादळाला सुरुवात झाल्यावर कोणीही बाहेर पडू नये असाही प्रचार करण्यात आला. अर्थात याचा फायदा लोकांकडून मिळणाऱ्या सहकार्यात झाल्याचे प्रशासनाने नमूद केले. 

वादळाच्या वेळी जिल्ह्याधिकारी रस्त्यावर 

प्रत्यक्षात हे वादळ जिल्ह्यात आल्यावर दुलंगे यांनी जीवाची पर्वा न करता थेट किनारपट्टीनजीकच्या महामार्गावर धाव घेतली. रस्त्यावर काही अडचण निर्माण झाल्यास लवकर पोचता यावे यासाठी दोन कॉडलेस फोन, चार ते पाच वेगवेगळे सीम कार्डचे मोबाईल आणि चार कर्मचाऱ्यांसह त्यांनी रस्त्यावर फिरणे पसंत केले. त्यांच्या या साहसाचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे. 

 

 विजय कुलंगे, जिल्हाधिकारी गंजाम, ओडिशा  : ओडिशात हवामान खात्याचा इशारा अत्यंत गांभीर्याने घेतला जातो. कुठल्याही वादळाची शक्यता वर्तवण्यात आली तरी आमची टीम सज्ज होते. याकरिता आधीच प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. यापूर्वी 'तितली' , फायलिन' सारख्या वादळांचा अनुभव असल्याने नागरिक अधिक सजग झाले आहेत.

टॅग्स :Fani Cyclone फनी वादळcollectorजिल्हाधिकारीOdishaओदिशा