केडगाव व पारगाव येथे शिवजयंतीनिमित्त झालेल्या दोन रक्तदान शिबिरांमध्ये 108 बाटल्या संकलित करण्यात आल्या. केडगाव येथील शिबिराचे आयोजन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व कै. रवींद्र शेळके प्रतिष्ठान यांनी केले होते. केडगाव येथील रक्तदान शिबिरामध्ये 48 बाटल्या रक्त संकलित झाले.यावेळी शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. स्थानिक ढोलताशा पथकांनी आपली कला दाखवली. पारगाव येथील शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 60 बाटल्या रक्त संकलित झाले. मुख्य चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दिवसभर शेकडो भक्तांनी अभिवादन केले.यावेळी मुख्य पेठेतून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी अजय लोमटे यांची व्याख्यान झाले.पारगाव सोसायटी समोर शेकडो भाविकांची उपस्थिती मध्ये शिवआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
पारगाव तालुका दौंड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आरती प्रसंगी उपस्थित भाविक.