शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 07:15 IST

महापालिकेच्या शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य खरेदी आवश्यक असलेला

पुणे : महापालिकेच्या शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य खरेदी आवश्यक असलेला निधी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. २९) स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य खरेदीचा निधी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायचा की डीबीटी योजनेद्वारे ठेकेदारांमर्फत विद्यार्थ्यांना वस्तूचा पुरवठा करायचा, यासाठी गेल्या एक-दीड महिन्यापासून महापालिकेत वाद सुरू होता.या प्रशासनाने थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचा प्रस्ताव दिला होता, तर सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी डीबीटी योजनेसाठी आग्रही होते. अखेर मंगळवारी (दि. २९) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत गणवेश व शालेय साहित्य खरेदीचा निधी थेट विद्यार्थी अथवा पालकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सध्या ६० टक्के विद्यार्थ्यांचे बँकेत खाते असून, येत्या पंधरा दिवसांत शिल्लक विद्यार्थ्यांची बँक खाती सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर १२ ते १४ जूनदरम्यान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येतील, असे स्थायी समिती अध्यक्ष मुळीक यांनी सांगितले.बैठकीत गणवेशाचा रंग बदलण्याचादेखील विषय ठेवण्यात आला होता. परंतु गतवर्षीचाच गणवेश कायम ठेवण्याच्या उपसूचनेसह या विषयाला मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि वेळेवर शालेय साहित्य उपलब्ध होऊ शकेल. यामध्ये महापालिकेच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि तांत्रिक विभागाकडील विद्यार्थी शिक्षण घेत असतात.या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गणवेश, बूट, मोजे, दप्तरे,वह्या, चित्रकलासाहित्य, लेखन साहित्य, पाट्या, बनियन, पेटीकोट, ट्रॅक सूट-बूट आणि स्वेटर, रेनकोट आदी शालेय साहित्य मोफत पुरविण्यात येते. सध्या महापालिकेच्या प्राथमिक विभागात २८७ शाळांमधून एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात प्राथमिकच्या ५२ हजार विद्यार्थ्यांचे व माध्यमिकच्या १२ हजार विद्यार्थ्यांची बँक खाती उघडलेली आहेत.