शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीओईपी करणार पाटील इस्टेट झोपडपट्टीचे पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:14 IST

प्रस्ताव शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाकडे

पुणे : सीओईपीच्या जागेवर अतिक्रमण करून पाटील इस्टेट झोपडपट्टी उभी राहिली आहे. त्यामुळे एसआरए योजनेअतंर्गत झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यात अडचण येत आहे. परंतु, आता नवीन अध्यादेशानुसार सीओईपीनेच पाटील इस्टेट झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी सीओईपीच्या वतीने या जागेवर झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यासाठी परवानगी मिळावी, असा प्रस्ताव शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविला आहे.

पाटील इस्टेट झोपडपट्टीला प्रचंड मोठी आग लागून तब्बल शंभर झोपड्या जळून खाक झाल्या. बुधवारी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रश्न समोर आला. परंतु, सीओईपीच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाटील इस्टेट झोपडपट्टीची जागा ही सीओईपीच्या मालकीची आहे. तब्बल ५ एकर जागेवर अतिक्रमण करून येथे ही झोपडपट्टी उभी राहिली आहे. या जागेवर तब्बल १,१०० झोपड्या असून, लोकसंख्या ७ हजारांच्या पुढे गेली आहे. या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र त्याला सीओईपीने आक्षेप घेतला होता. ही त्यांची खासगी जागा असल्याने त्यांनी हा निर्णय घेत न्यायालयाचे दार ठोठावले होते. या झोपडपट्टीमध्ये याआधीही आगीची घटना घडली आहे. तसेच, शहरातील अन्य झोपडपट्ट्यांमध्येही वारंवार अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एसआरएची स्कीम लवकरात लवकर व्हावी, यासाठी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी झोपडपट्टीवासीयांनीही पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे असल्याचेही मत या वेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पाटील इस्टेट झोपडपट्टीच्या विषयात सीओईपीच स्कीम करणार असल्याने फारसा विरोध होणार नाही, अशी आशाही अधिकाºयांनी व्यक्त केली.खासगी जागेवर झालेल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी विकसकाला फायदा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे या ठिकाणी स्वत:च विकसक म्हणून पुनर्वसनाची योजना करण्याला सीओईपी तयार झाली आहे.त्यांनी त्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली असून, त्यांचा हा प्रस्ताव तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवला आहे. तेथे परवानगी मिळाल्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणही त्याला तत्काळ मंजुरी देणार असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. ती मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया करून, येथील काम सुरू होण्याची शक्यता आहे.