शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
5
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
6
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
7
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
8
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
9
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
10
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
11
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
12
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
13
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
14
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
15
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
16
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
17
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
18
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
19
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
20
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...

चोरट्याने पळविले कपाट

By admin | Updated: May 20, 2015 23:10 IST

भर वस्तीमध्ये राहणाऱ्या खेड पंचायत समितीचे कक्ष अधिकारी रमेश इष्टे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.

राजगुरुनगर : भर वस्तीमध्ये राहणाऱ्या खेड पंचायत समितीचे कक्ष अधिकारी रमेश इष्टे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. कपाट उघडत नसल्याने चोरट्यांनी चक्क मोठे कपाट घेऊनच पोबारा केला़ या कपाटात २ तोळे सोन्याचे दागिने व रोख १० हजार रुपये, महत्त्वाचे कागदपत्रे आणि कपडे होते़ आठवड्यातील घरफोडीची ही दुसरी मोठी घटना आहे.याबाबत अधिक माहिती अशी, की खेड पंचायत समितीचे कक्ष अधिकारी रमेश इष्टे हे काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. शनिवारी १६ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाला कुलूप असल्याने आणि कपाट मजबूत असल्याने त्यांना कपाटाचे कुलूप तोडता आले नाही. या कपाटात जास्त माल असावा, असा चोरट्यांना संशय असावा की काय म्हणून चोरट्यांनी चक्क मोठे कपाटच उचलून नेले आहे. विशेष म्हणजे रात्री चोरी करताना घराचे कुलूप तोडताना शेजारी राहणाऱ्यांना थांगपत्ता लागला नाही. इतकेच नव्हे, तर घरातील मोठे कपाट चोरताना कपाटाचा आवाज आजूबाजूला कोणाला गेला नाही, हे नवल आहे. या घरफोडीची फिर्याद त्यांनी खेड पोलिसांत दिली असून, पोलीसदेखील या चोरीने चक्रावून गेले आहेत. चोरट्यांनी चक्क कपाटच उचलून नेल्याने परिसरात चर्चेचा आणि तितकाच चोरट्यांच्या दहशतीचा विषय बनला आहे.राजगुरुनगर शहरात भरदिवसा आणि रात्री घरात कोणी नसताना पाळत ठेवून मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत. आठवड्यातील मोठ्या चोरीची दुसरी घटना आहे. राजगुरुनगर शहर आणि परिसरात अनेक घरफोड्या आणि चोऱ्या होत आहेत. वाहनचोरीची संख्या लक्षणीय आहे. मात्र, पोलिसांना एकाही चोरीचा तपास लावण्यात यश आले नाही़ सध्या शाळांना सुट्ट्या, लग्नसराईची लगबग असल्याने अनेक कुटुंबे परगावी जातात. मात्र, यावर पाळत ठेवून सराईत चोर घरातील चोरी करून निघून जातात. (वार्ताहर)पोलिसांना वाढलेल्या शहरात रात्रीची गस्त घालणे शक्य होत नाही; कारण येथे अपुरे पोलीस बळ आहे. नागरिकांनीची याबाबत खबरदारी घेऊन बाहेर जाताना घरातील दागदागिने, किमती वस्तू, किमती ऐवज त्यांच्या सुरक्षिततेवर सांभाळून ठेवावा. घरात किमती ऐवज ठेवू नये, असे आवाहन खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. व्ही. इंगवले यांनी केले आहे.