शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

ढगाळ हवामानाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:16 IST

बारामती, इंदापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे द्राक्षउत्पादक हवालदिल झाले आहेत. काही प्रमाणात बारामती परिसरात पाऊस झाला.

बारामती : बारामती, इंदापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे द्राक्षउत्पादक हवालदिल झाले आहेत. काही प्रमाणात बारामती परिसरात पाऊस झाला. त्याचाही फटका द्राक्षउत्पादकांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे. ढगाळ हवामान, तुरळक पावसामुळे दुपारी १२ पर्यंत हवेत कमालीचा गारवा होता. नागरिक चांगलेच गारठले आहेत.जानेवारीमध्ये १०.७ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांत त्यानंतर पुन्हा आज थंडी वाढली, तर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. येत्या दोन दिवसांत पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. कृषितज्ज्ञांनी तापमान आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली आहे. वाढत्या थंडीचा, पावसाचा द्राक्षबागा,भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.बारामती, इंदापूर तालुक्यात द्राक्षबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. जवळपास ७५ टक्के द्राक्षबागांची काढणी पूर्र्ण झाली आहे. उर्वरित २५ टक्के बागांची काढणी सध्या सुरू आहे. द्राक्षांना दरदेखील सध्या चांगले आहेत. या २५ टक्के बागांमध्ये सध्या पडणाºया कडाक्याच्या थंडीमुळे, ढगाळ हवामान, पावसाने द्राक्षांनातडे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.द्राक्षांना तडे जाण्याबरोबरच द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचीदेखील भीती आहे. याशिवाय भाजीपाला, कडधान्य पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. डाळींब बागांवर वाढत्या थंडीमुळे, ढगाळ हवामान, पावसामुळे तेल्या रोगाचे सावट आहे. वातावरणातील या बदलाची परिस्थिती अशीच कायम राहिली, तर या पिकांच्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे.>लासुर्णे : इंदापूर तालुक्यामध्ये सुमारे तीन हजार सहाशे एकर द्राक्षाच्या क्षेत्रामधून २५ हजार मेट्रीक टन द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. या मध्ये बोरी (ता. इंदापूर) येथे द्राक्षांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकºयांचा निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेण्याकडे कल असतो.१ आॅगस्टपासून द्राक्षांच्या छाटणीस सुरवात करण्यात येते. १ ते २० आॅगस्टपर्यंत छाटणी केलेल्या द्राक्षांच्या हंगामास सुरवात झाली असून परदेशातील चायना, मलेशिया देशामध्ये बोरी गावातील द्राक्षांची निर्यात होत आहे.ढगाळ हवामानामुळे द्राक्षेच्या बागेवर विविध रोगांचाप्रादुर्भाव होऊन द्राक्षांचे मणी क्रँक जाणार असून यामुळे व्यापारी या भागातील द्राक्ष कमी दराने मागत असल्याने शेतकरी दोन्ही बाजूने अडचणीत सापडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.>गहू, कांदापिक धोक्यातदौंड : हवामानाची अशीच परिस्थिती आठ ते दहा दिवस राहिली, तर हरभरा, गहू, आंबा, द्राक्ष, डाळिंब यांसह अन्य पिकांवर रोगराईचे सावट निर्माण होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवारी दौंड तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी आल्या. त्यामुळे पहाटेच्या सुमारास धुके निर्माण होऊन हवामानात बदल झाला. जर हवामान असेच राहिले तर हरभºयावर घाटी आळी रोग, गव्हावर तांबेºयाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.द्राक्षांवर बोरी रोग, तर डाळिंबावर मावा रोग पडू शकतो. याचबरोबरीने आंब्याचा मोहोर गळण्याची, कांद्यावर करपा पडण्याची दाट शक्यताआहे. एकीकडे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना नैसर्गिक संकट शेतकºयांवर येऊ शकते. तेव्हा शेतकºयांनी नेमके काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.>गेल्या दोन दिवसांपासून हवामान बदलले आहे. हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांची शक्यता अधिक आहे. इतर दिवशी ३० ते ३२ अंश सेल्सिअस असणारे तापमान बुधवारी (दि. ७) २४ ते २५ अंशांपर्यंत हे घसरले आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. या थंड हवामानामुळे द्राक्षांना तडे जाण्याची शक्यता आहे. ज्वारीचे काढलेले पीक झाकून ठेवावे. ढगाळ हवामानाच्या पार्श्वभूमीवर पावसाची शक्यता लक्षातघेऊन औषध फवारणीचे शेतकºयांनी नियोजन करावे. पिकांवरील रोगराई टाळण्यासाठी पाऊस येण्यापूर्वी औषध फवारणी करावी. तसेच,पाऊस येण्यापूर्वी फवारणीशक्य न झाल्यास पाऊस येऊन गेल्यानंतर औषधफवारणी करावी. त्यामुळे पिकांवर होणारा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होईल.- डॉ. सय्यद अली,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख>वेळीच दखल घेणे गरजेचेबदलत्या हवामानामुळे शेतकºयांनी वेळीच शेतीची दखल घेणे गरजेचे आहे. तरीदेखील काळजी करण्याचे कारण नाही. हे ढगाळ वातावरण १ ते २ दिवस राहिले तर त्याचा विपरीत परिणाम पिकांवर होऊ शकत नाही. मात्र असेच वातावरण आठवडाभर राहिले तर याचे नुकसान काही पिकांना सोसावे लागेल. तेव्हा शेतकºयांनी काही अडचणी असल्यास दौंड तालुका कृषी कार्यालयाकडे संपर्क साधावा.- अनिल बोरावके, (दौंड तालुका कृषी अधिकारी)