शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
2
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
3
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
4
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
5
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
6
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
7
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
8
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
9
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
10
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
11
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
12
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
13
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
14
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
15
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
16
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
17
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
18
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
19
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
20
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!

लष्कराकडून रस्ता कायमचा बंद

By admin | Updated: October 21, 2015 00:50 IST

संरक्षण खात्याकडून वारंवार बंद केला जाणारा पिंपळे सौदागर येथील कुंजीर वस्ती ते रक्षक सोसायटी चौक हा रस्ता रहदारीसाठी खुला करावा, यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी

रहाटणी : संरक्षण खात्याकडून वारंवार बंद केला जाणारा पिंपळे सौदागर येथील कुंजीर वस्ती ते रक्षक सोसायटी चौक हा रस्ता रहदारीसाठी खुला करावा, यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने हा रस्ता कायमस्वरूपी बंद करण्याबाबतचा निर्णय दिला. त्यानुसार संरक्षण विभागाने मंगळवारी २० आॅक्टोबरला सकाळी ६ वाजल्यापासून रस्ता बंदची अंमलबजावणी केली. काही वर्षांपूर्वी संरक्षण विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला कुंजीर वस्ती ते रक्षक सोसायटी चौक हा सार्वजनिक वापराचा रस्ता कायमस्वरूपी बंदच करत आहोत, अशी नोटीस दिली होती. नोटीस मिळाल्यानंतर पालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूंस सुरक्षा भिंती बांधणे, उड्डाणपूल उभारणे असे अनेक पर्याय लष्कराला सुचविले होते. परंतु, लष्कराने सुरक्षेची कारणे देत सर्व पर्याय धुडकावून लावले. त्यानंतर नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली गणेश काटे, शांताराम शेलार, राजेश पाटील, कुंभार यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे संरक्षण खात्याच्या विरोधात एक जनहित याचिका दाखल करून रस्ता बंद विरोधात स्थगिती मिळवली होती. मात्र, या ठिकाणीसुद्धा संरक्षण खात्याने राष्ट्रीय सुरक्षा आणि अतिरेकी हल्ला अशी कारणे दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. हा रस्ता नागरिकांसाठी नेहमीसाठी खुला राहावा म्हणून शत्रुघ्न काटे, नाना काटे, केंद्रीय पोलाद उत्पादन समिती सदस्य संदीप काटे यांच्यासह अनेकांनी संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, त्याला यश आले नाही. (वार्ताहर)पिंपळे सौदागरला पोलीस छावणीचे स्वरूप संरक्षण विभागाने कुंजीरवस्ती ते रक्षक सोसायटी चौक रस्ता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी ६ वाजतापासून कायमस्वरूपी बंद करणार असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून या रस्त्यावर अगदी पहाटे ४ वाजल्यापासून शेकडो पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते.