पुणो : सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठातील विद्याथ्र्याना कमी दरात भोजन उपलब्ध करून देता यावे, या उद्देशाने विद्यापीठात सुरू करण्यात आलेले उपाहारगृह (रिफेक्ट्री) काही दिवसांपासून बंद आहे. उपाहारगृह चालविणारा कंत्रटदार अचानक काम सोडून गेल्यामुळे विद्याथ्र्याना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, विद्याथ्र्याना चांगल्या दर्जाचे भोजन उपलब्ध करून देण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाला आता गांभीर्याने विचार करावा लागेल.
विद्यापीठातील विद्याथ्र्याना कमी किमतीत चांगल्या दर्जाचे भोजन उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी विद्यापीठात अनेक वेळा आंदोलने झाली. विद्याथ्र्याना पौष्टिक व सकस भोजन मिळालेच पाहिजे, यासाठी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनीसुद्धा वेळेवेळी आवाज उठवला. परंतु, उपाहारगृह कंत्रटी पद्धतीने चालविण्यास दिले जाते. त्यामुळे विद्याथ्र्याना अनेक वेळा निकृष्ट दर्जाचे भोजन मिळते. तर काही वेळा कंत्रटदार अचानक रिफेक्ट्री बंद करतो. त्यामुळे विद्याथ्र्याना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यापीठाने या संदर्भात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्याथ्र्याकडून केली जात आहे. रिफेक्ट्रीचालकाने अचानक काम बंद करू नये यासाठी विद्यापीठाकडून संबंधिताकडून काही रक्कम ठेव म्हणून घेतली जाते. (प्रतिनिधी)
विद्यापीठाचे उपाहारगृह चालविणारा कंत्रटदार काही कारणास्तव अचानक काम सोडून गेला; परंतु विद्याथ्र्याची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यापीठातर्फे त्यांच्या भोजनाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थिनींना भोजन उपलब्ध करून देणा:या कंत्रटदाराकडून विद्याथ्र्याना भोजन उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचप्रमाणो रिफेक्ट्री पुन्हा सुरळीतपणो सुरू व्हावी, यासाठी विद्यापीठातर्फे योग्य पाऊल उचलले जात आहे.
- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू,
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ