शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आधी वेफर्सचे प्लॅस्टिक बंद करा; मग दुधाचे- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 02:44 IST

सरकारने वेफर्स कंपन्यांसह इतर प्लॅस्टिकबंद उत्पादनांच्या पिशव्यांवर निर्बंध घालावेत, त्यानंतर दुधाचा विचार करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

पुणे : सरकारने वेफर्स कंपन्यांसह इतर प्लॅस्टिकबंद उत्पादनांच्या पिशव्यांवर निर्बंध घालावेत, त्यानंतर दुधाचा विचार करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. तसेच प्लॅस्टिककोंडी न फुटल्यास दुधाचे भाव १२ ते १५ रुपये लिटरमागे वाढतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने प्लॅस्टिकचा पुनर्वापर न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. प्रत्येक दूध उत्पादकांना आणि वितरकांना बाजारात विकल्या गेलेल्या दुधाच्या पिशव्या संकलित कराव्या लागणार आहेत. मात्र ते शक्य नसल्याने प्लॅस्टिक उत्पादक संघटनेने १५ डिसेंबरनंतर प्लॅस्टिकचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून प्लॅस्टिकबंदी जाणवू शकते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शेट्टी म्हणाले, की दूध पिशव्यांचे संकलन करणे वितरकांना जिकिरीचे होणार आहे. तसेच संकलित झालेल्या पिशव्यांमध्ये काही प्रमाणात दूध शिल्लक असल्याने त्याचा वास येण्याचा अथवा अळ््या होण्याचा संभव असतो. याशिवाय ४५ ते ५० रुपये लिटरमागे खर्च करणारा ग्राहक प्लॅस्टिक पिशवीचा एक रुपया परत मिळविण्यासाठी पिशवी परत देईलच असे नाही. त्यामुळे असे संकलन कटकटीचे होईल. सरकारने दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांबाबत अशीच दंडेली सुरू केल्यास आम्ही बाटलीबंद दूध सुरू करू. त्यानंतर मात्र दुधाच्या किमतीत लिटरमागे १२ ते १५ रुपयांची वाढ होईल.दुधाच्या भेसळीचा आधीच प्रश्न आहे. बाटलीबंद दूध केल्यास भेसळीची शक्यता अधिक वाढते. त्याची जबाबदारी नक्की कोणावर, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तसेच बाटलीची स्वच्छता करण्यासाठीदेखील लाखो लिटर पाण्याची आवश्यकता भासेल, याचेही भान ठेवले पाहिजे. सरकारने वेफर्ससह इतर प्लॅस्टिकबंद उत्पादनांवर असेच निर्बंध घालावेत. त्यानंतर दूध पिशवीचा विचार व्हावा.- राजू शेट्टी

टॅग्स :milkदूधRaju Shettyराजू शेट्टी