शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

राज्यात ‘स्वच्छता अभियान’ गतिमान करणार : बबनराव लोणीकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 21:49 IST

शासनाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये २५ हजार शौचालये उभारण्यात आली असून गेल्या काही वर्षात प्रबोधनामुळे पंढरपूरची वारी निर्मल झाली आहे.

ठळक मुद्देस्वच्छता व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभनिर्मलवारीमध्ये २५० हून अधिक कलाकार सहभागी 

पुणे : प्रबोधनाच्या माध्यमातून निर्मलवारीचे महत्व राज्यभर पोहोचले असून याच माध्यमातून राज्यात ‘स्वच्छता अभियान’ अधिक गतिमान करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी केले.  ग्रामविकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने विधानभवन परिसरात आयोजित स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी लोणीकर बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते-पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पाणी पुरवठा संचालक डॉ. सतीश उमरीकर, उपायुक्त (विकास) कांत गुडेकर यावेळी उपस्थित होते. स्वच्छता ही जनसेवा असून जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे,असे नमूद करून बबनराव लोणीकर म्हणाले, पंढरपूरच्या वारीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी सहभागी होतात. या वारक-यांना शासनाच्या वतीने सर्व सुविधा पुरविल्या जातात. पंढरपूरच्या वारीत शेतकरी, कष्टकरी जनता सहभागी होत असते. पंढरपूर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये २५ हजार शौचालये उभारण्यात आली असून गेल्या काही वर्षात प्रबोधनामुळे पंढरपूरची वारी निर्मल झाली आहे. विश्वास देवकाते-पाटील म्हणाले, पंढरपूरच्या वारीच्या कालावधीत पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वारक-यांना सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. पालखी मार्गावर मोठ्या वाहनांना जाता येत नाही. त्यामुळे दूचाकी वरून आरोग्य सेवा पुरवली जात आहे.डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, स्वच्छता दिंडीत राज्यभरातील १७ जिल्ह्यांचे चित्ररथ सहभागी झाले आहेत. चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी शासनाच्या वतीने ‘नमामि’ चंद्रभागा अभियान सुरू करण्यात आले असून हे अभियान चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यभरातून आलेल्या निवडक कलापथकांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीत सहभागी झालेल्या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.........निर्मलवारीमध्ये २५० हून अधिक कलाकार सहभागी वारकऱ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन व प्रबोधन करण्यासाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद,जालना, लातूर, ठाणे,अहमदनगर ,बीड, नांदेड,परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ व औरंगाबाद या जिल्ह्यातून जिल्हा परिषदेच्या उत्तम दर्जाचे कलापथक या स्वच्छता दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच विविध स्वच्छता संदेशांनी रंगविलेले चित्ररथ वारीमध्ये सहभागी होणार आहेत.निर्मलवारीमध्ये २५० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत.पालखी सोहळ्यानिमित्त अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविला जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाBabanrao Looneykarबबनराव लोणीकर