शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणाचे बिगूल; पण कालवा अस्वच्छ, कालव्याचे झाले डंपिंग ग्राऊंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 01:59 IST

वानवडी परिसरातून लष्कर, एम्प्रेस गार्डन, जांभुळकर मळा, बी. टी. कवडे रोड पास करून पुढे वैदूवाडी, हडपसर, फुरसुंगीतून कालवा पुढील गावातून वाहत असतो.

वानवडी : वानवडी परिसरातून लष्कर, एम्प्रेस गार्डन, जांभुळकर मळा, बी. टी. कवडे रोड पास करून पुढे वैदूवाडी, हडपसर, फुरसुंगीतून कालवा पुढील गावातून वाहत असतो. परंतु, या कालव्याची दुरवस्था झाली असून कचराच कचरा दिसत असल्याने कालव्याचे डंपिंग ग्राऊंड झाल्याचे चित्र आहे.पुणे शहराच्या पूर्व भागात पाणी मिळण्यासाठी खडकवासला धरणातून ज्या कालव्याद्वारे पाणी सोडले जाते, त्यात कचऱ्याचे प्रमाण खूप वाढले असल्याने जमिनीसारखा भाग तयार होऊन त्यावर कुत्री, जनावरे बसत असल्याने अशा पाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो तसेच कठड्यांची, भिंतीची दुरवस्था होऊन कालव्याच्या पात्रात ढासळल्याने पात्र कमी होऊन पाण्यातच दगडमातीचे ढीग साचले आहेत.पुणे शहरात स्वच्छ सर्वेक्षणाचे बिगूल वाजत असताना जीवनावश्यक गोष्टीपैंकी महत्त्वाच्या समजल्या जाणाºया ‘पाणी’ वाहणाºया कालव्याच्या स्वच्छतेकडे पुणे महापालिका व पाटबंधारे खात्याचे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. या कालव्याची कधीही स्वच्छता होत नाही.तळाला असलेल्या घाणीमुळे जीवजंतू, प्राणी व मृतदेह यात अडकून सडतात व तेच पाणी पुढे शेतीसाठी आणि पिण्यासाठी वापरले जाते.पुणे शहरातील नदीसुधारणेसाठी केंद्राकडून ९०० कोटी रुपयांची तरतूद झालेली असताना कालव्याच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेने लक्ष देऊन पाटबंधारे खात्याशी सल्लामसलत करून निधी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि कालवा स्वच्छ करून ढासळलेल्या, तुटलेल्या भिंतीची बांधणी करावी जेणेकरून स्वच्छ व कचरामुक्त पाणी मिळून कालवाफुटीसारखे प्रकार होणार नाहीत.काही दिवसांपूर्वीच खडकवासला धरणातून कालव्यात पाणी सोडणे बंद केल्याने कालव्यातील घाणीची, कचºयाची परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.मागेसुद्धा जनता वसाहतीत कालवा फुटल्यानंतर कालव्याची सत्य स्थिती समोर आली होती. परंतु, त्यानंतरही कालव्याच्या स्वच्छतेकडे व दुरुस्तीकडे महापालिका, पाटबंधारे खात्याने फारसे लक्ष दिले गेले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता तरी पाण्यातील जीव तसेच कालव्यातील पाणी वापरत असलेल्या नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता कालवा दुरुस्त करून कचराविरहित करण्याकडे महापालिका व पाटबंधारे खात्याने लक्ष दिले पाहिजे.संरक्षक कठड्यांची पूर्तता नाहीच...रेसकोर्स रस्ता ते बी. टी. कवडे रस्ता यांना जोडणाºया कालव्याच्या शेजारील रस्त्याचा काही भाग ढासळला होता. त्यानंतर तिथे भर टाकून तो दुरुस्त करण्यात आला. परंतु, त्याच वेळी कालव्याच्या बाजूने संरक्षक जाळ्या किंवा कठडे लावण्याची मागणी झाली होती.अद्यापही या ठिकाणी संरक्षक जाळ्या किंवा कठड्याची पूर्तता झालेली नसल्याने कालव्याचे असणारे पात्र रस्त्याच्या समांतर असल्याने वाहने कालव्यात जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे संरक्षक जाळ्या किंवा कठडे लवकरात लवकर लावावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.अधिकारी फोन उचलेनात...कालव्याचा संबंध ज्या खात्याशी येतो अशा पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना कालव्याच्या स्वच्छतेविषयीची माहिती घेण्यासाठी वारंवार फोन केला; परंतु फोन उचलत नसल्याने यासंबंधीची माहिती मिळाली नाही.कालव्याच्या देखभालीचा निर्णय पाटबंधारे खात्याचा असल्याने त्यांची जर परवानगी व सहकार्य करण्याचे पत्र महापालिकेला मिळाले, तर आमच्या वतीने कालवा स्वच्छ करून संरक्षक जाळ्या किंवा कठडे बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.- कालिंदा पुंडे,नगरसेविका, वानवडी

टॅग्स :Puneपुणे