शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला अनिश्चित कालावधीसाठी कारागृहात ठेवणे गैर असल्याचा दावा

By admin | Updated: July 6, 2017 03:32 IST

हडपसर येथील मोहसीन शेख खून खटल्यातील आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांना गेली ३ वर्षे जामीन न झाल्याने

 लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : हडपसर येथील मोहसीन शेख खून खटल्यातील आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांना गेली ३ वर्षे जामीन न झाल्याने येरवडा कारागृहात ठेवले आहे़ कुठलेही सबळ कारण नसताना या खटल्यात अद्याप दोषारोपनिश्चितीचेही काम झालेले नाही़ आरोपीला अनिश्चित कालावधीसाठी कारागृहात ठेवले जाते हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला असून घटनेच्या तरतुदीच्या २१ ची पायमल्ली होत असल्याचा अर्ज अ‍ॅड़ मिलिंद पवार व अ‍ॅड़ भालचंद्र पवार यांनी विशेष न्यायालयात केला आहे़ मोहसीन शेख खून खटल्याचे कामकाज विशेष न्यायाधीश जे़ टी़ उत्पात यांच्या न्यायालयापुढे सुुरू आहे़ फेसबुकवरील बदनामीकारक मजकुरामुळे हडपसर येथे दंगल उसळली होती़ त्यात २ जून २०१४ रोजी मोहसीन शेख यांचा खून झाला होता़ सरकारच्या वतीने तत्कालीन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दोषारोप निश्चित करण्यात यावेत, असा अर्ज दाखल केला होता़ त्यानंतर अ‍ॅड़ निकम यांची नियुक्ती सरकारने रद्द केली होती़ मोहसीनचे वडील शेख मोहंमद सादिक यांनी न्यायालयात अर्ज करून या खटल्यात अ‍ॅड़ रोहिणी सॅलियन यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती़ हा खटला ३ वर्षे प्रलंबित आहे़ सरकार पक्षाच्या वतीने कोणीही न्यायालयात उपस्थित राहत नाही़   धनंजय देसाई हे घटनेच्या वेळी घटनास्थळावर हजर नव्हते़ तसेच खुनाचा कट रचला किंवा सहआरोपींबरोबर कटकारस्थान केले, हा सरकार पक्षाचा आरोप सकृतदर्शनी सिद्ध होत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच देऊन धनंजय देसाई यांची याचिका दाखल करून घेतली आहे़ असे असताना आरोपीला अनिश्चित कालावधीसाठी कारागृहात ठेवले जाते, ही घटनेच्या तरतुदीच्या २१ ची पायमल्ली होत असून देसाई यांना न्याय मिळावा, असा अर्ज अ‍ॅड़ पवार यांनी न्यायालयात केला आहे़ न्यायालयाने अर्ज दाखल करून सरकार पक्षाला त्यावर आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत़ खटल्याची पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणार आहे़