शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

पालिकेविरोधात दावा, तरीही टॉवर्स

By admin | Updated: August 19, 2016 06:21 IST

सर्व मोबाईल कंपन्यांनी पालिकेने मिळकतकर वसूल करू नये यासाठी पालिकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. १०० कोटींची मागणी व २०० कोटींची थकबाकी

पुणे : सर्व मोबाईल कंपन्यांनी पालिकेने मिळकतकर वसूल करू नये यासाठी पालिकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. १०० कोटींची मागणी व २०० कोटींची थकबाकी, असे तब्बल ३०० कोटी रुपये विविध मोबाईल कंपन्यांकडून येणे बाकी आहे. तरीही पालिका प्रशासन व नंतर पदाधिकाऱ्यांनीही नव्याने विशिष्ट कंपन्यांना पालिकेच्या मालकीच्या ३९४ जागा भाडेकराराने देण्याला मंजुरी दिली आहे. यात पालिकेच्याच काही विभागांनी दोषी ठरविलेल्या कंपन्यांचाही समावेश आहे.पालिका हद्दीत उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवर्सना पालिकेच्या वतीने कर आकारण्यात येतो. त्या त्या कंपन्यांना हा कर लावला जातो; मात्र या कंंपन्यांनी आम्हाला कसलीही कर आकारणी करू नये, यासाठी पालिकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. त्यामुळे पालिकेला करवसुलीत अडचण येत आहे. त्यावर उपाय म्हणून पालिकेने ज्या इमारतींवर टॉवर उभा केला आहे, त्या इमारतीच्या मालकाला कर जमा करण्याची नोटीस बजावली आहे; मात्र तिथेही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.काही मोबाईल कंपन्यांनी टॉवर्ससाठी मागणी केलेल्या ३९४ जागा प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी विनाचर्चा मंजूर करून टाकल्या आहेत. या जागा ज्या कंपनीला द्यायच्या आहेत, त्या कंपन्यांबाबत पालिकेच्याच बांधकाम विभागाने प्रतिकूल अभिप्राय व्यक्त केला असल्याकडे नगरसेवक संजय बालगुडे यांनी महापौर प्रशांत जगताप व पालिका आयुक्त कुणाल कुमार यांचे लक्ष वेधले आहे. विरोधातील दावे मागे घेतले जात नाहीत व अधिकृत परवानगी घेऊन टॉवर्स उभारले जात नाही, तोपर्यंत टॉवर उभारणीसाठी मंजुरी देऊ नये, असे बालगुडे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)शहर हद्दीत विविध मोबाईल कंपन्यांचे सुमारे २ हजार २४७ टॉवर्स आहेत. त्यांच्याकडून यावर्षीची पालिकेची मिळकतकराची मागणी १०० कोटी रुपयांची आहे. सर्व कंपन्यांकडे मिळून थकबाकी २०० कोटी रुपयांची आहे. यातील अनेक कंपन्यांनी टॉवर उभारताना पालिकेच्या बांधकाम खात्याची परवानगी घेतलेली नाही. लोखंडी, अवजड बांधकाम असल्याने इमारत ते पेलू शकेल किंवा नाही, याची तपासणी (स्ट्रक्चरल आॅडिट) होणे गरजेचे असतानाही तशी तपासणी कोणी करून घेतलेली नाही. इमारत मालकाला टॉवर्सचे भाडे मिळते, पालिकेच्या पदरात मात्र काहीही पडायला तयार नाही.