पिंपरी : अंगावर घाण आणि खाज येणारा पदार्थ टाकून नागरिकांना लुटणाऱ्या तसेच गाडीच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे़ राजू किसना अय्यर (वय २४) आणि शंकर राजू नायडू (वय २०, दोघेही रा़ अन्नानगर, ता़ हुजूर, भोपाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत़ त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिला आणि एक अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे़ पोलिसांनी आरोपींकडून १० लाख ५२ हजारांचा माल जप्त के ला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील महिलांच्या अंगावर घाण टाकून त्यांचे पैसे लुटण्याच्या घटना घडल्या होत्या़ ६ आॅक्टोबरला चिंचवडमध्ये कल्याणी मुंगसे यांच्या अंगावर घाण व खाज येणारा पदार्थ टाकून त्यांच्याकडील १ लाख रुपयांची रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला होेता़ खबऱ्याने चिंचवड स्टेशन परिसरात एका दुचाकीवर दोन संशयित फि रत असल्याची माहिती पोलिसांना दिली़ त्यानुसार पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी चारही बाजूने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले़ त्यांची चौकशी करीत असताना त्यांनी मुके असल्याचे सोंग केले़ मात्र, पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली़ त्या वेळी त्यांनी राजू आणि शंकर अशी नावे सांगितली़ चौकशीदरम्यान त्यांनी महिलेच्या अंगावर घाण टाकून चोरी केल्याची क बुली दिली़ चौकशीदरम्यान त्यांची महिलांची व पुरुषांची टोळी असून, त्यांनी पुणे शहरात अशाच प्रकाराचे गुन्हे केल्याचे कबूल केले़ (प्रतिनिधी)
शहरातील आंतरराज्य टोळी जेरबंद
By admin | Updated: October 13, 2016 01:58 IST